एक्स्प्लोर

Accident News : मोठी बातमी! लग्नाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा; लग्न करून घरी येताना भीषण अपघातात वधु वरासह 5 ठार; सजलेल्या कारचा अन् स्वप्नाचाही चक्काचूर

Chhattisgarh News : नववधू-नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यानंतर परतत असताना हा भीषण अपघात घाला. या भीषण अपघातात गाडीचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला.

Chhattisgarh Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक (Truck-Car Accident) दिल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात नववधू-नवरदेवासह (Bride-Groom) पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात हा अपघात घडला. रविवारी सकाळच्या सुमारास ह अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीला धडक मारून आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

गाडीचा भरधाव ट्रकाची धडक

वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून परतत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना हा अपघात घडला. नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून तपास करत आहे. 

आरोपी ट्रकचालकाने पळ काढला

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढली. जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेले, मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने गाडीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

ट्रकच्या धडकेत कारचा चेंदामेंदा

पहाटे पाच वाजेच्या सुमारास पकारिया जंगलातील चंडीदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. धडकेचा आवाज ऐकून स्थानिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यांनी सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेलं. सर्व जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

नववधू-वराचा करुण अंत

या भीषण अपघाताची माहिती मिळताच वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण लागलं आहे. जिथे कालपर्यंत सनई-चौघडे वाजत होते, आता तिथे शांतता पसरली आहे. बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं शनिवारी रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cashless Treatment: रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार; 4 महिन्यांत सुविधा संपूर्ण देशात होणार लागू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget