एक्स्प्लोर

नाईट कर्फ्यू ते सणासुदीत निर्बंध; ओमायक्रॉनविरोधात केंद्राकडून राज्याला पंचसुत्री 

Covid-19 Omicron Variant : देशात ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे.

Covid-19 Omicron Variant : देशात ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात आतापर्यंत 320 पेक्षा जास्त ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला काही सूचना केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विरोधातली लढाई कायम ठेवावी, त्यासाठी तयार राहावे, धैर्य सोडू नये असा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने 26 नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉन या प्रकाराला चिंतेची बाब म्हणून जाहीर केले आहे, त्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत आढवा बैठक घेतली. यामध्ये लसीकरणासह ओमायक्रॉन विरोधातील लढ्याच्या तयारीबाबतची माहिती जाणून घेतली. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोरोनाच्या आलेखावर प्रकाश टाकला. तसेच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाकडेही लक्ष वेधले.  

रुग्ण पॉझिटीव्हीटी 10% पेक्षा जास्त वाढेल किंवा ऑक्सिजनयुक्त बेडची व्याप्ती 40% पेक्षा जास्त वाढेल तेव्हा जिल्हा/स्थानिक प्रशासनाद्वारे स्थानिक प्रतिबंधात्मक उपाय केले जातील.  तथापि, स्थानिक परिस्थिती आणि लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित, जसे की घनता इत्यादी, आणि ओमायक्रॉनची उच्च फैलावक्षमता लक्षात घेऊन, राज्ये/केंद्रशासित प्रदेश या स्थितीत  पोहोचण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात आणि निर्बंध लादू शकतात, याचा पुनरुच्चार ही आरोग्य सचिवांनी यावेळी केला. कोणतेही निर्बंध किमान 14 दिवसांसाठी लागू केले पाहिजेत, असा सल्ला यावेळी द्यांना राज्यांना दिला. ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात, त्यांचा संक्रमणाचा दर जास्त असतो आणि कालावधी दुप्पट असतो, कोरोन प्रतिबंधासाठी केंद्राकडून राज्यांना पंचसुत्री देण्यात आली आहे.  

'ओमायक्रॉन'चा सामना करण्यासाठी केंद्राकडून देण्यात आलेली पंचसुत्री...  

1: सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियंत्रण सुनिश्चित करा. रात्री संचारबंदी लावा आणि विशेषत: आगामी उत्सवांच्या आधी, मोठ्या मेळाव्याचे कडक नियमन सुनिश्चित करा.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत कंटेमेंटन झोन (Containment Zones - प्रतिबंधित क्षेत्र), बफर झोन (Buffer Zone-सुरक्षीत क्षेत्र) याची यादी तयार करा. तसेच वेळ न घालवता करता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवा.

2. चाचणी आणि लक्ष ठेवण्याबाबत, राज्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येवर बारीक आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले होते;  यानुसार दररोज आणि  प्रत्येक आठवड्याला रुग्ण पॉझिटीव्हीटी;  दुपटीचा दर;  आणि नव्याने जास्त रुग्ण वाढणारी ठिकाणे या भागात प्रतिबंध सुरू करा असे सांगण्यात आले. आरटी-पीसीआरचे योग्य प्रमाण सुनिश्चित करा: दररोज घेतल्या जाणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरएटी (किमान 60:40) असावे. हे 70:30 गुणोत्तरापर्यंत वाढवले जाऊ शकते.

3. खाटांची संख्या वाढवावी, रुग्णवाहिकांसारख्या खात्रीशीर प्रवासी सुविधावर लक्ष पुरवावे, गरज पडल्यास रुग्णाला हलवण्यासाठीची व्यवस्थांची अंमलबजावणी करावी. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत आणि गरज भासल्यास वापरात असण्याची खात्री करून घेत रहा. किमान 30 दिवसांचा औषधांचा साठा राखीव राहू द्या. सध्याच्या नियमावलीनुसार गृहविलगीकरण/अलगीकरण यांचे  सक्तीने पालन करावे.

4. लोकांना भयभीत कऱणारी माहिती देऊ नका. नागरिकांना वारंवार सूचना आणि माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा, जेणेकरून भिती वा चुकीची माहिती पसरण्यास आळा बसेल.  माध्यमांना नियमितपणे परिस्थितीबद्दल माहिती देणे.

5.  लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या. तसेच ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांचेही लसीकरण तात्काळ करा. 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या तसेच दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाच्या सरासरीपेक्षा कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणावर विशेष लक्ष देणे. ज्या ठिकाणाचं लसीकरण राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा कमी असेल तेथे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम तीव्र करणे. येत्या काळात ज्या राज्यात निवडणूका होणार आहेत त्या राज्यांनी तातडीने लसीकरणाला वेग देणे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
Asia Cup 2025 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई, साहिबजादा फरहानला फटकारलं
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई
Embed widget