एक्स्प्लोर
मध्ये रेल्वेची पहिली रेल्वे अॅम्ब्युलन्स रुळावर!

मुंबई : मध्य रेल्वेने भारतातील पहिली रेल्वे रुग्णवाहिका तयार केली आहे. अपघाताच्या वेळी किंवा रेल्वेच्या आरोग्य शिबिरांसाठी ही रुग्णवाहिका वापरता येणार आहे. नाशिक येथे दीड वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही रुग्णवाहिका तयार करण्यात आली होती. संपूर्णपणे वातानुकूलित असलेले चार डबे, किमान 50 रुग्णांसाठीची सुविधा, सर्व प्रकारची तपासणी सुविधा आणि छोट्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा या रुग्णवाहिकेत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत याचा फायदा होईल, असं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे. लोणावळा येथे गुरुवारी झालेल्या रेल्वेच्या आरोग्य शिबिरासाठी ही रुग्णवाहिका कल्याणहून लोणावळ्याला नेण्यात आली. रेल्वे रुग्णवाहिकेचे फायदे
- रेल्वे अपघातांसारख्या परिस्थितीत जखमींना तातडीने मदत पोहोचवणे
- रुग्णांना कमीत कमी वेळेत रुग्णालयात जाता येईल.
- अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार पुरवता येतील.
- कुंभ मेळ्यासारख्या कार्यक्रमात वैद्यकीय सुविधा पुरवणे
- ज्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधा नाहीत, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यास मदत होईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























