एक्स्प्लोर
केंद्र सरकारकडून पाच बँकांवर सीईओंची नियुक्ती
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाच सरकारी बँकांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर दोन बँकांच्या सीईओंची बदली केली आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये इंडियन ओव्हरसीस बँकेचे मुख्य संचालक आणि सीईओ सुब्रमण्यम कुमार यांचाही समावेश आहे.
केंद्र सरकारच्या Department of personnel and training (DOPT) विभागाने यासंदर्भात शुक्रवारी अध्यादेश काढला. नव्या नियुक्तीनुसार, आर. सुब्रमण्यम कुमार यांना इंडिन ओव्हरसीस बँकेच्या प्रबंध संचालक आणि सीईओपदी बढती देण्यात आली आहे. ते सध्या याच बँकेत कार्यकारी संचालक पदावर कार्यकरत आहेत. DOPT च्या अध्यादेशानुसार, सुब्रमण्यम 30 जून 2019 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बदल्यांसदर्भात नियुक्त केलेल्या समितीने यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार, ओरिएंटल बँकेचे कार्यकारी संचालक राजकिरण राय यांच्याकडे युनियन बँक ऑफ इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या अध्यादेशानुसार, त्यांच्याकडे युनियन बँकेची तीन वर्षांसाठी ही जबाबदारी असेल.
याशिवाय कॉर्पोरेशन बँकेचे कार्यकारी संचालक सुनील मेहता यांची पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंजाब नॅशनलच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालिका उषा अनंतसुब्रमण्यन यांच्याकडे अलाहबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी 31 ऑगस्ट 2018 पर्यंत असणार आहे.
तर कॅनेरा बँकेचे कार्यकारी संचालक दीनबंधू मोहपात्रा यांना बँक ऑफ इंडियाच्या सीईओ आणि व्यवस्थापकिय संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. बँक ऑफ इंडियाचे विद्यमान सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एम. रेगो यांच्याकडे सिंडीकेट बँकेची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक आर. ए. शंकर नारायण यांची विजया बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी संचालकपदी बढती मिळाली आहे.
नाव | बँक |
आर. सुब्रमण्यम | इंडियन ओव्हरसीस बँक |
सुनील मेहता | पंजाब नॅशनल बँक |
उषा अनंतसुब्रमण्यन | अलाहबाद बँक |
दीनबंधू मोहपात्रा | बँक ऑफ इंडिया |
एम. रोगो | सिंडीकेट बँक |
आर.ए.शंकर नारायण | विजया बँक |
राजकिरण राय जी | युनियन बँक ऑफ इंडिया |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement