CDS Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातात 13 जणांचा मृत्यू , एएनआयचं वृत्त
CDS Bipin Rawat Chopper Crash : लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं.
CDS Bipin Rawat Chopper Crash : भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. सीडीएस रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे मोठे अधिकारीही होते. नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपीन रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. रावत यांच्या नातेवाईकांशी राजनाथ सिंह यांनी चर्चा केली. हेलिकॉप्टर अपघाताबाबत राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. या घटनेनंतर यावर आता कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने संध्याकाळी 6.30 वाजता बैठक बोलावली आहे.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' करण्यात येणार आहे.
IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.
CDS Gen Bipin Rawat Helicopter Crash Updates | CDS जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टर क्रॅश Updates
संबंधित बातम्या :
- IAF MI 17 Helicopter : सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; जाणून घेऊया काय आहेत त्याची वैशिष्ट्ये
- CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
- Bipin Rawat Helicopter Crash : हवाई दलाच्या हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी संरक्षणमंत्री उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती