(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CBSE Board Exam Date Sheet 2021: CBSE दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जारी होणार
सध्या CBSE ची परीक्षा कधी सुरु होणार आणि कधी संपणार याबाबतच विद्यार्थ्यांना माहिती आहे. मात्र कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा असेल यांची सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
CBSE Exams 2021 Date Sheet : CBSE च्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक 2 फेब्रुवारी रोजी जारी केलं जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं आहे. एका लाईव्ह शिक्षण सत्रादरम्यान विविध विषयांवर बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या CBSE ची परीक्षा कधी सुरु होणार आणि कधी संपणार याबाबतच विद्यार्थ्यांना माहिती आहे. मात्र कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा असेल यांची सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, लवकरच विद्यार्थ्यांना याबाबत सविस्तर माहिती मिळणार असल्याचे आज शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेवरून स्पष्ट झालं आहे.
आजच्या लाईव्ह सेशनमध्ये रमेश पोखरियाल यांनी CBSE शाळांच्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुमारे एक हजार शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रमुखही यात सहभागी होते. यात चर्चेचा मुख्य मुद्दा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ग्राऊंड रुट लेवलला कसं लागू करावा याबद्दल बोलणं झालं.
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत पार पडणार आहेत. 1 मार्च 2021 पासून प्रॅक्टिकलला सुरुवात होणार आहे. तर, निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं या तारखा जाहीर होणं सोयीचं मानलं जात आहे. ज्यामुळे आता हाताशी उरलेल्या वेळाचा ते पूर्ण उपयोग करत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.
संबंधित बातम्या