एक्स्प्लोर
Advertisement
Board Exams 2021 | सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी, रिझल्टवरुन नापास शब्दही हटवला : रमेश पोखरियाल
Board Exams 2021 : केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी बोलताना सांगितलं की, सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून 'नापास' हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं.
Board Exams 2021 : देश सध्या कोरोना व्हायरससोबत लढा देत आहे. अशातच शिक्षण विभागासमोर बोर्ड परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्न उभा ठाकला आगे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षांवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केलं. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून 'नापास' हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीची जगभरातून कौतुक केलं जात आहे.
दरम्यान, कोरोना संकटात सीबीएसईसह इतर बोर्डाच्या परीक्षाही कधी होणार, कशा घेतल्या जाणार, जेईई मेन्स आणि नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांचं शेड्यूल कसं असणार, या सर्व प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत. आतापर्यंत सीबीएसई परीक्षा 2021 ची डेटशीट जारी करण्यात आलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत सर्व शंकांचं निरसन केलं.
9, 2020 at 9:17:56 PM UTC-8">रमेश पोखरियाल यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :Interacting with teachers, parents and students on upcoming competitive/board exams. #EducationMinisterGoesLive @EduMinOfIndia @SanjayDhotreMP @PIB_India @MIB_India @DDNewslive https://t.co/qOsUBJ2J30
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 10, 2020
- मी सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना आवाहन करतो की, अभ्यासक्रमातील कोणते चॅप्टर्स हटवले आहेत, यासंदर्भात आपल्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती द्या. याबाबत कोणतीही शंका ठेवू नका.
- परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल.
- बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीसाठी जर शाळा सुरु करण्यात आल्या तर सुरेक्षेसाठीच्या उपाययोजनांवरही पोखरियाल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, "मास्कचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सांगितलेल्या सर्व नियमांचं काम करा. नीट परीक्षा यासंदर्भातील सर्वात मोठं उदाहरण आहे."
- भारताच्या नवी शिक्षण प्रणालीचं जगभरातून कौतुक होत आहे.
- शाळा सुरु करण्याचा निर्णय आम्ही त्या-त्या राज्यांवर सोपावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 17 राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
- 2021 च्या बोर्डाच्या परीक्षांसाठी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.
- सीबीएसईच्या गुणपत्रिकेवरुन 'नापास' हा शब्द हटवण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement