Narendra Giri Death : महंत नरेंद्र गिरी मृत्यूचा तपास आता CBI कडे, उत्तर प्रदेशच्या शिफारसीला केंद्राची मान्यता
Narendra Giri Death : महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास या आधी उत्तर प्रदेश पोलीस करत होते. आता तो CBI कडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Narendra Giri Death : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांची आत्महत्या की हत्या याचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केंद्राकडे केली होती. केंद्राने गुरुवारी याला मान्यता दिली असून लवकरच सीबीआय याचा तपास सुरु करणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास या आधी उत्तर प्रदेश पोलीस करत होते. त्यासाठी प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 18 जणांची एक टीम तयार करण्यात आली होती. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावी अशी मागणी केली.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात वाद
या आधी महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद यांच्यात या आधी एकदा वाद झाला होता. या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांची माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकला.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price Today : डिझेल कडाडलं, 70 दिवसांनी दरांत वाढ, नव्या किमतींनुसार एका लिटरसाठी किती पैसे?
- Assam Violence : अतिक्रमण विरोधी कारवाईला हिंसाचाराचे गालबोट, पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू; CID चौकशीचे राज्य सरकारचे आदेश
- महाराष्ट्रातील 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या 'रेस टू झिरो'मध्ये, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न