(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assam Violence : अतिक्रमण विरोधी कारवाईला हिंसाचाराचे गालबोट, पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू; CID चौकशीचे राज्य सरकारचे आदेश
Assam Violence : आसाममधील ढोलपूर या ठिकाणी पोलीस आणि नागरिक आमने-सामने आले असून त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
गुवाहाटी : ईशान्य भारतात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यातील ढोलपूर या ठिकाणी पोलिसांनी सुरु केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आता हिंसाचाराचे गालबोट लागलं असून त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत नऊ पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचं वृत्त आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Violence broke out in Darrang during an anti-encroachment drive).
दरांग जिल्ह्यातील ढोलपूर या ठिकाणी जवळपास 1,487 एकर परिसरात 800 कुटुंबांनी अवैध्यरित्या कब्जा मिळवून त्या ठिकाणी रहायला सुरु केल्याचं प्रशासनानं सांगितलं होतं. त्यामुळे या जमीनीवरील अतिक्रमण हटवून ती जमीन पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यावेळी तिथले रहिवासी आणि पोलीस आमने-सामने आले हिंसाचाराची घटना घडली.
Assam: Violence broke out in Sipajhar of Darrang during an anti-encroachment drive
— ANI (@ANI) September 23, 2021
SP Darrang, Sushanta Biswa Sarma says, "They (people at the spot) pelted stones & attacked Police personnel. 9 Policeman injured, I'm inquiring about the video that's doing rounds on social media"
या ठिकाणी जवळापास दहा हजार लोक अवैध्यरित्या वस्ती करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या जमीनीवरील हे अतिक्रमण उठवून ती ताब्यात घेणे आणि तिचा वापर शेतीसाठी करणे अशा प्रकारचा ठराव आसामच्या राज्य मंत्रिमंडळाने पारित केला आहे. त्या आधारे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
आसाम पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उडवली आहे. तसेच दरांग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे मुख्यमंत्र्यांचे लहान बंधू असल्याने त्यांच्या आदेशावरच नागरिकांवर गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप विराधी पक्षांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :