एक्स्प्लोर
भारताचा रॉकेटहल्ला, पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, व्हिडीओ व्हायरल
दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास सोपे जावे म्हणून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
![भारताचा रॉकेटहल्ला, पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, व्हिडीओ व्हायरल Caught on Camera Pakistani chowkis being destroyed by India latest updates भारताचा रॉकेटहल्ला, पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, व्हिडीओ व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/23075446/kashmir-attack.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मू-काश्मीर जवळील नियंत्रण रेषेवर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईचा व्हिडीओ समोर आला आहे. यात भारताने रॉकेट आणि तोफांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्याचं दिसत आहे.
भारतीय सैन्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मेंढर सेक्टर भागातील आहे. या ऑपरेशनमध्ये सैनिकांनी पाकिस्तानी चौक्यांसह अनेक बंकर देखील उद्ध्वस्त केले आहेत.
लष्कर मुख्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराच्या स्थानिक कमांडर्सना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे.
यंदा म्हणजे गेल्या 50 दिवसात एलओसीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात किमान 20 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर सहाहून अधिक पाक सैनिक जखमी झाले.
भारतीय सैन्याच्या गोळीबारामुळे पाकिस्तानने एलओसीजवळील त्यांच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास सोपे जावे म्हणून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराकडून एलओसीवर ‘प्रो-अॅक्टिव्ह ऑपरेशन्स’ चालवलं जात आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)