एक्स्प्लोर

CAA विरोधातल्या हिंसक आंदोलनात आठ जणांचा मृत्यू, 50 पोलीस जखमी

नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. काल उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

लखनौ : नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. काल (20 डिसेंबर) उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशसह देशातल्या इतर राज्यातही आंदोलनाला हळूहळू हिंसक वळण मिळताना दिसत आहे. तर मंगळुरुत झालेल्या हिंसक आंदोलनात 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान काल महाराष्ट्रातही जवळपास 15 हून अधिक जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता.

दरम्यान, कालच्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये लखनौ, प्रयागराज, अलीगड, आग्रा, मेरठ, आजमगढ यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

परवा (19 डिसेंबर) नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात सयंमानं आंदोलनं झाली. मात्र काल अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले. काल हिंगोलीपासून हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली. सकाळी जमावाने हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात बसची तोडफोड केली. या हिंसक आंदोलनाचं लोण बीड आणि परभणीतही पोहोचलं आहे. बीडमध्ये जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. तर परभणीमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये कायद्याविरोधात रॅली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल पुन्हा एकदा कोलकात्यात मोठी रॅली काढणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली जनमत जमवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हानही ममता बॅनर्जींनी मोदींना दिलं आहे.

टीएमसीची बैठक शुक्रवारी जयपुरमध्ये भाजपकडून NRC आणि CAA च्या समर्थनार्थ भव्य रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शहीद स्मारक, गव्हर्न्मेंट हॉस्टेलपासून रॅली सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बंगालमध्ये NRC आणि CAA कायदा लागू करण्यासाठी सक्तीने विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी टीएमसी नेते आणि आमदारांना बैठकीत सहभागी होण्यास सांगितले आहे.

अलीगड मुस्लीम विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशभरात जामियातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल (गुरुवारी) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, कर्नाटकातील मंगळूरू, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं करण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget