एक्स्प्लोर
13860 कोटींचा काळा पैसा, गुजरातचा व्यापारी फरार
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीकडे तब्बल 13 हजार कोटी 860 रुपयांचा काळा पैसा आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीने स्वत:च त्याच्याकडे काळापैसा असल्याचा दावा केला आहे. महेश शाह असं त्यांचं नाव असून ते एक प्रॉपर्टी डीलर आहे.
सरकारच्या इन्कम डिस्क्लोजर स्कीमअंतर्गत आयकर विभागाला 67 वर्षीय महेश शाहांनी त्यांच्याकडील काळ्या पैशांची माहिती दिली आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. महेश शाहांचा जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, अशी माहिती त्यांच्या सीएने दिली आहे.
6237 कोटी रुपये टॅक्स म्हणून द्यायचे
महेश शाहांनी 13,860 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा खुलासा केला आहे. इन्कम डिस्क्लोजर स्कीम अंतर्गत त्यांना 45% रक्कम टॅक्स म्हणून द्यायची आहे. याप्रमाणे त्यांना एकूण 6237 कोटी रुपये टॅक्स द्यायचा आहे. स्कीमअंतर्गत पहिला हफ्ता 1560 कोटी रुपयांचा आहे.
महेश शाहांच्या घरासह कार्यालयावर छापा
एक सामान्य घरात राहणाऱ्या महेश शाहांना चार हफ्त्यांमध्ये 45 टक्के टॅक्स भरायचा होता. महेश शाहांना 30 नोव्हेंबरला टॅक्स म्हणून 25 टक्के म्हणजेच 1560 कोटी रुपये जमा करायचे होते. पण मुदत संपल्याने आयकर विभागाने 28 नोव्हेंबरलाच संपूर्ण डिस्क्लोजर रद्द करुन, 29 आणि 30 नोव्हेंबरला महेश शाह आणि त्याचा सीए तेहमूल सेठनाच्या जागांवर छापा टाकला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महेश शाहांच्या घर आणि कार्यालयांसह, चार्टर्ड अकाऊंट फर्म 'अप्पाजी अमीन' वरही छापा टाकला आहे.
पण महेश शाहांकडे खरंच 13 हजार 860 कोटी रुपयांचं काळं धन आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement