Video : रेल्वे ओव्हरब्रीजवर दुचाकीचा अपघात, तरुण तब्बल 60 फुटांवरून घराच्या छतावर कोसळला!
या अपघातात मुलांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी गर्दी जमली. घराच्या छतावर पडलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बुरहानपूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूर (Burhanpur) जिल्ह्यातील नेपानगर रेल्वे स्टेशन ओव्हरब्रिजवर (Nepanagar Railway Station) एक विचित्र अपघात झाला. पुढच्या चाकात यांत्रिक बिघाड झाल्याने दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुले पुलाच्या दुभाजकावर आदळली. या धडकेनंतर दुचाकीच्या पॅसेंजर सीटवर बसलेला एक व्यक्ती 60 फूट उंचीच्या पुलावरून कोसळून थेट पुलाखाली असलेल्या घराच्या छतावर आदळला. या अपघातात मुलांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी गर्दी जमली. घराच्या छतावर पडलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
घरमालक कैलाश पथरिया यांनी सांगितले की, ओव्हरब्रिजवर हा अपघात झाला तेव्हा ते घरात बसून चहा पीत होते. त्यांना त्यांच्या घराच्या छतावरून मोठा आवाज आला. "आम्ही घरातील सर्वजण बाहेर पडलो आणि पाहिलं तर तरुण छतावर होता," ते पुढे म्हणाले की, मोठा आवाज ऐकून लोक छतावरून त्या तरुणाला वाचवण्यासाठी घराकडे धावू लागले. घटनास्थळी उपस्थित लोक छतावर चढून तरुणाला खाली आणले आणि उपचारासाठी नेपानगर येथील आरोग्य केंद्रात नेले.
नेपानगर रेल्वे ओव्हरब्रिजची उंची सुमारे 60 फूट
विजय महाजन असे जखमीचे नाव आहे. तो बलवाडा गावचा रहिवासी आहे. अजय चौकसे या मित्रासोबत तो दुचाकीवरून घरी जात होता. दुचाकीवरून जाताना अपघात होऊऊन उडून छतावर कोसळला तो विजय महाजन होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अजय चौकसेच्या हाताला व कमरेला दुखापत झाली. नेपानगर रेल्वे ओव्हरब्रिजची उंची सुमारे 60 फूट आहे.
विद्युत तारांवर न पडल्याने मोठी दुर्घटना टळली
लहान मुलगा पुलाच्या खाली असलेल्या कोणत्याही विद्युत तारांवर न पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सरकारी अधिकाऱ्यांनी ओव्हरब्रिज बांधल्यानंतर त्याच्या बाजूला रेलिंग बांधले असते तर ही दुर्घटना टळली असती, असे लोकांचे मत आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी रेलिंग बसवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या