एक्स्प्लोर

Supreme Court : शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरणार नाही याची लेखी लिहून द्या; अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं खडसावलं!

शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. 'घड्याळ' व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे, असेही तोंडी सांगितले.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला (Ajit Pawar faction) सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार (Sharad Pawar) यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहेत? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटाने 'घड्याळ' व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले.

छगन भुजबळांचे विधान वाचून दाखवले 

शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले. अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना घड्याळ चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

शरद पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अधिकृत गट शरद पवार यांच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या संबंधित असलेले 'घड्याळ' चिन्ह आणि प्रचार साहित्यात ज्येष्ठ पवारांची नावे आणि छायाचित्रे वापरत आहे. सिंघवी यांनी छगन भुजबळ यांनी केलेले विधान वाचून दाखवले. ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरमध्ये 'घड्याळ' चिन्ह आणि शरद पवारांची चित्रे वापरावीत, असे भुजबळ म्हणताना दिसतात. 

तुम्ही त्यांची छायाचित्रे का वापरत आहात?

"तुम्ही त्यांची छायाचित्रे का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुमची छायाचित्रे वापरा?" अशी विचारणा अजित पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांना न्यायमूर्ती कांत यांनी केली. मनिंदर सिंग म्हणाले की पक्ष ते करत नाही आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी केले असावे. मनिंदर पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांद्वारे सर्व सोशल मीडिया पोस्टर्सवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही, तेव्हा खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक आहे.

"आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही त्यांचे नाव, फोटो इ. वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नाही," असे न्यायमूर्ती कांत यांनी सिंग यांना सांगितले. सिंग यांनी याबाबत हमीपत्र दाखल करण्याचे मान्य केले. गेल्या महिन्यात या याचिकेवर नोटीस बजावताना न्यायालयाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी देऊन तात्पुरता दिलासा दिला होता. यापूर्वी, निवडणूक आयोगाने त्यांना 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या राज्यसभा निवडणुकीपर्यंत हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेटBhaskar Jadhav on Cabinet | खातेवाटप करायचं नव्हतं तर मग मंत्रि‍पदाची शपथ कशाला दिली? -भास्कर जाधवSandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय, पवारांसमोर आक्रमक भाषणCM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Embed widget