एक्स्प्लोर

बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर बडतर्फ

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये झालेल्या चौकशीत बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तेज बहाद्दूर दोषी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. तेज बहाद्दूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर तेज बहाद्दूर यांनी आणखी एक व्हिडीओ करुन छळ सुरु असल्याचा आरोपही केला होता. मात्र बीएसएफने तेज बहाद्दूर यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. खोटी तक्रार करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप तेज बहाद्दूर सिंह यांच्यावर होता. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये ज्या जवानांची चौकशी केली, त्यापैकी कोणीही निकृष्ट जेवण दिलं जात असल्याची तक्रार केलेली नाही. तर दुसरीकडे तेज बहाद्दूर यांना धमकी दिली जात असून त्यांचा मानसिक छळही सुरु असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी  केला होता. तेज बहाद्दूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकाराचा अहवाल मागवला. तेज बहाद्दूर यांच्याविरोधात बेशिस्तपणासह अनेक आरोपांची चौकशी सुरु होती. तसंच स्वेच्छानिवृत्तीची याचिकाही फेटाळली होती. कोण आहेत तेज बहाद्दूर यादव? तेज बहाद्दूर यादव हे बीएसएफचे जवान आहेत. त्यांनी भारतीय सैन्यदलातील असुविधांबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. आम्ही सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत तेज बहादूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे. “आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगताना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं होतं. संबंधित बातम्या व्हायरल सत्य : तेज बहाद्दूर यांचा मृत्यू झाला की नाही? ‘मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले’, जवानाचा बीएसएफला सवाल जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Diwali 2026: नक्षलवाद संपल्यानंतर बस्तरमध्ये पहिली दिवाळी; मोदींनी जवानांसोबत साजरा केला सण; विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, आता खरी लढाई 'दिमागी नक्षलवाद्यांशी'
नक्षलवाद संपल्यानंतर बस्तरमध्ये पहिली दिवाळी; मोदींनी जवानांसोबत साजरा केला सण; विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, आता खरी लढाई 'दिमागी नक्षलवाद्यांशी'
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Sharad Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Embed widget