Breaking News LIVE | राज्यात आज 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
Breaking News LIVE Updates, 1 March 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच! निर्बंध वाढवण्याची शक्यता
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (28 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 3753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 008 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
पूजा चव्हाण प्रकरण : आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई, शांताबाई चव्हाण यांना पोलिसांची नोटीस
माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.
'कोविड-19' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-19' लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारी 1 मार्च 2021 पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही राबविण्यात येणार आहे.