एक्स्प्लोर
भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी
भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून सरोज पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सरोज पांडे यांच्यासोबतच अनिल बलुनी, जीव्हीएल नरसिंहा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या, म्हणजेच सोमवारी संपणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसची यादी आज रविवारीच जाहीर होईल. महाराष्ट्रातून सहापैकी चार नावं जाहीर झाली आहेत. भाजपने एकूण नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये सर्व केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भाजपकडून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे अशी दोन नावं जाहीर झाली आहेत. नारायण राणे सोमवारीच अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसेंचं नाव चर्चेत असलं, तरी खडसे अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तिसरा कोण याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर भाजपकडून जावडेकर आणि नारायण राणे अशी चार नावं जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसची एकमेव जागा कुणाला मिळणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार वंदना हेमंत चव्हाण - राष्ट्रवादी डी. पी. त्रिपाठी - राष्ट्रवादी रजनी पाटील - काँग्रेस अनिल देसाई - शिवसेना राजीव शुक्ला - काँग्रेस अजयकुमार संचेती - भाजप केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त? भाजप -17 काँग्रेस - 12 समाजवादी पक्ष - 6 जदयू - 3 तृणमूल कॉंग्रेस - 3 तेलुगू देसम पक्ष - 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2 बीजद - 2 बसप - 1 शिवसेना - 1 माकप - 1 अपक्ष - 1 राष्ट्रपती नियुक्त - 3 संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. कोणत्या राज्यातील किती जागा? आंध्र प्रदेश - 3 बिहार - 6 छत्तीसगड - 1 गुजरात - 4 हरियाणा - 1 हिमाचल प्रदेश - 1 कर्नाटक - 4 मध्य प्रदेश - 5 महाराष्ट्र - 6 तेलंगणा - 3 उत्तर प्रदेश - 10 उत्तराखंड - 1 पश्चिम बंगाल - 5 ओदिशा - 3 राजस्थान - 3 झारखंड - 2 याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे. संबंधित बातम्या
राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?
राज्यसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातून राणेंसह 3 नावं निश्चित : सूत्र
राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक
राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून अनिल देसाईंना पुन्हा संधी
जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार
जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























