हेमंत करकरेंना मी देशभक्त मानत नाही; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस हेमंत करकरे (IPS Hemant Karkare) यांना काही लोक देशभक्त मानतात, पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP MP Pragya Thakur) यांनी केलं आहे.
भोपाळ : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात की, "हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला."
देशात एक आणिबाणी 1975 साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही 2008 साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं हेमंत करकरे यांनी तोडल्याचंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं.
#WATCH | BJP MP Pragya Thakur says, "An Emergency was imposed in 1975 & an Emergency-like situation had formed in 2008 when Sadhvi Pragya Singh Thakur was jailed in Malegaon blast case...People call Hemant Karkare a patriot, but those who are real patriots don't call him one..." pic.twitter.com/UgplzFd1d7
— ANI (@ANI) June 25, 2021
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या 2008 साली मालेगावात झालेल्या स्फोटातील एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत त्यांची चौकशी केली होती.
दरम्यान,आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :