एक्स्प्लोर

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.

नवी दिल्ली : भाजपचे खासदार ओम बिर्ला हे 17 व्या लोकसभेचे नवे  अध्यक्ष बनले आहेत. लोकसभा अध्यक्षपदी बिर्ला यांची बिनविरोध निवड झाली. ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघामधून भाजपचे खासदार आहेत. 17 जून रोजी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर वीरेंद्र कुमार यांची हंगामी लोकसभाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणिर बीजेडीने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. यानंतर ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. ओम बिर्ला यांची कारकीर्द ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा कोटामधून खासदारपदी निवडून आले आहेत. 2003, 2008 आणि 2013 मध्ये बिर्ला राजस्थान विधानसभेवर निवडून आले होते. ओम बिर्ला यांनी सलग सहा वर्ष अखिल भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तर राजस्थान भाजयुमोच्या अध्यक्षपदीही ते सहा वर्ष विराजमान होते. उपाध्यक्षपदावर कोणाचा अधिकार? लोकसभेचा उपाध्यक्ष कायमच विरोधी पक्षामधूनच निवडला जातो. ज्यात विरोधीपक्ष परस्पर सहमतीने या पदासाठी नेत्याची निवड करतात. मात्र मागच्या वेळी मोदी सरकारने ही परंपराही बदलली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपाध्यक्षपद एआयएडीएमकेच्या एम. थंबीदुरई यांच्याकडे होतं. मोदी सरकारबाबत एआयएडीएमकेची भूमिका सौम्य आहे, त्यामुळेच त्यांना हे पद देण्यात आल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. दुसरीकडे, आंध्र प्रदेशात क्लीन स्वीप देणारी वायएसआर काँग्रेसही उपाध्यक्षपदाची तगडी दावेदार मानली जाते. 25 पैकी 22 जागा मिळवत वायएसआर काँग्रेस लोकसभेत तृणमूलच्या जोडीने चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. बिजू जनता दल किंवा वायएसआर काँग्रेसच्या पदरात लोकसभा उपाध्यक्षपद पडल्यास शिवसेना उपेक्षित राहण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget