(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला! तीव्रता वाढली, तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ
Cyclone Biparjoy Update : बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे.
Cyclone Biporjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अत्यंत तीव्र वादळाच्या श्रेणीत रुपांतर झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र आता हे चक्रीवादळाने मार्ग बदलला असून हे उत्तर-ईशान्य दिशेने पुढे जात आहे. 'बिपरजॉय' तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 175 किलोमीटरहून अधिक आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाच्या अंदाजे मार्गात बदल झाला आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ कराचीच्या दक्षिणेला सुमारे 1,120 किमी अंतरावर होतं. चक्रीवादळाच्या आसपासच्या समुद्री भागात 130 ते 160 किमी ताशी वेगाने वारे वाहत आहेत.
११/०६:अरबी समुद्रावरील बिपरजॉय अत्यंत तीव्र चक्री वादळ झाले:सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला चक्रीवादळ इशारा (पिवळा संदेश):
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
सकाळी 5.30 वा मुंबईपासून 580किमी
सौराष्ट्र-कच्छ व लगत पाकिस्तानच्या किनारपट्टीला १५/०६ दुपारी मांडवी-कराची दरम्यान ओलांडण्याची शक्यता;वारे 125-135kmph-150 kmph
बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये धडकण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 'बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.'
तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ
बिपरजॉय चक्रीवादळ तौक्तेनंतरच सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा चक्रीवादळ धडकणार तेव्हा वाऱ्यांचा ताशी वेग 125 ते 135 किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकण्याची शक्यता नाही. बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील महिन्यात आलेलं मोखा चक्रीवादळ देखील अत्यंत तीव्र वादळाच्या श्रेणीत रुपांतरीत झालं होतं. आता बिपरजॉय चक्रीवादळानंही अत्यंत रौद्ररूप धारण केलं आहे.
मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा
15 जूनपर्यंत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील चार राज्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकणार नसलं तरी, याचा परिणाम देशात जाणवणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील चार राज्यांना फटका
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात देखील आज वाऱ्यांचा वेग अधिक राहणार आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. देशातील चार राज्यांना बिपरजॉयचा फटका बसणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातला सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.