कर्जधारकांसाठी 4 बँकांचा मोठा दिलासा, तीन महिन्यांनंतर हप्ते भरण्याची सूट
कृषी, गृह, वाहन, लघु आणि मध्यम उद्योग, वैयक्तिक कर्ज, कॉर्पोरेट कर्जांचा समावेश असणार आहे. तसंच कॅश क्रेडीट फॅसिलिटीवरची रिकव्हरी पण तीन महिन्यासाठी थांबवली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅनरा बॅंक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बॅंक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या चार बँकांकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तीन महिने हप्ता भरला नाही तरी चालणार आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढील तीन महिन्यांसाठी वाढवला जाईल असं देखील नमूद केलं आहे. त्यामुळे सध्या चार बँकांनी कर्जधारकांना मोठा दिलासा दिलासा दिला आहे. मात्र इतर बँकांच्या निर्णयाकडे सध्या लक्ष आहे.
महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध प्रकारचे ईएमआय भरण्याचे दिवस सुरु होतात. 27 मार्चला रिझर्व बॅंकेनं तीन महिने कर्जाचे हप्ते देण्याची सक्ती करु नका असे निर्देश दिले होते. परंतु अंतिम निर्णय बॅंकावर सोडला होता. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी चा बॅंकानी ज्यात कॅनरा बॅंक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल आणि बॅंक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे.त्यांनी पुढच्या तीन महिन्यासाठी हप्ते न देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार कर्जाचा कालावधी पुढे तीन महिने वाढवला जाईल असं देखील नमूद केलं आहे. ही मुभा 1 मार्च ते 31 मे या कालावधीसाठी असणार आहे.
Sanjeev Gokhale on RBI | आरबीआयच्या सल्ल्यांवर अर्थविषयाचे अभ्यासक संजीव गोखले यांचं विश्लेषण
या मध्ये सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. कृषी, गृह, वाहन, लघु आणि मध्यम उद्योग, वैयक्तिक कर्ज, कॉर्पोरेट तसंच कॅश क्रेडीट फॅसिलिटीवरची रिकव्हरी पण तीन महिन्यासाठी थांबवली आहे. या निर्णयाबरोबरच रेपोरेट कमी केल्यानं कर्जावरचा इंटरेस्ट रेट कमी करुन त्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णयही काही बॅंकानी घेतला आहे.
संबंधित बातम्या :
SBI अध्यक्ष रजनीश कुमार म्हणतात कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित; पण...
Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्लामहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
