Kasaragod Fire: दिवाळीला गालबोट; केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, 150 हून अधिक जखमी
Kasaragod Fire: मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान फटाक्यांनी भरलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 150 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
Big Explosion In Fireworks Storage In Kasaragod: देशभरात धुमधडाक्यात दिवाली साजरी केली जात आहे. पण, या दिवाळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. केरळच्या कासारगोडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान फटाक्यांनी भरलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 150 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोटामुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. तसेच, घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. तसेच, जखमींचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एका धार्मिक कार्यक्रमावेळी हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथे सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. इथे फटाक्यांना आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Kerala: Over 150 injured in fireworks accident in Kasargod
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2024
Read @ANI Story | https://t.co/OzW08r8d1s#Kerala #fireworksaccident pic.twitter.com/epgXoFX4xy
अंजुतांबलम वीरकावू मंदिरात ही दुर्घटना घडली. इथे मंदिरात वार्षिक कलियाट्टम उत्सव साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी फटाक्यांची मोठी ऑर्डर देण्यात आली होती. सर्व फटाके एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले होते. दरम्यान, रात्री 12.30 वाजता अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच धुराचे लोळ दिसू लागले. स्फोट एवढा भीषण होता की, आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.