एक्स्प्लोर
बंगळुरु विनयभंग प्रकरणी पाच दिवसांनी कारवाई, चौघांना बेड्या
बंगळुरु : नवीन वर्षाच्या स्वागतावेळी बंगळुरुत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांना अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आयटीआयचा विद्यार्थी असलेल्या मुख्य आरोपीसह चार जणांना अटक झाली असून दोघांचा शोध सुरु आहे.
मुख्य आरोपी अय्यप्पा हा आयटीआयचा विद्यार्थी असून पिझा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्याशिवाय लेनो आणि सोम शेखर हे हेल्पर म्हणून काम करणारे दोघे आणि ड्रायव्हर असलेला सुदेश यांना अटक झाली आहे. चौघांव्यतिरिक्त आणखी दोन आरोपी परागंदा आहेत.
31 डिसेंबरला तरुणीचा विनयभंग करण्याआधी आरोपी तब्बल आठवडाभर तिचा पाठलाग करत होते. तरुणी कुठं काम करते? कुठं राहते? याची पूर्ण माहिती त्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे पीडित तरुणी फक्त आठवडाभर आधीच बंगळुरुमध्ये राहायला आली होती.
तरुणीशी असभ्य वर्तन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली. अखेर पाच दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. पीडिता ईशान्येकडील राज्याची रहिवासी असून तिने पोलिसात जबाब दिला असला तरी तक्रार दाखल केलेली नाही.
विनयभंगाची घटना घडली त्या जवळच्या घराबाहेरी सीसीटीव्ही कॅमेरातही घटना कैद झाली. संबंधित रहिवाशाने हे फुटेज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी केस दाखल केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement