Congress Twitter: काँग्रेस पक्षाचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे कोर्टाचे आदेश- काय आहे प्रकरण
बंगळुरूच्या एका न्यायालयाने ट्विटरला काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेसविरोधात कॉपीराइट केस दाखल केली.
Congress Twitter Blocked: बंगळुरूच्या एका न्यायालयाने सोमवारी ट्विटरला काँग्रेस पक्ष (Congress Party) आणि भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एमआरटी म्युझिक कंपनीने (MRT Music) काँग्रेसविरोधात कॉपीराइट केस दाखल केली. या हँडल्सवर KGF-2 चित्रपटातील गाण्यांचे व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे. असे केल्याने कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसवर करण्यात आला आहे.
एमआरटी म्युझिकने काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi), जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाते यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. म्युझिक कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, केजीएफ-2 गाण्याचे हिंदीतील हक्क मिळवण्यासाठी आम्ही खूप पैसे मोजले आहेत.
म्युझिक कंपनी काय म्हणाली?
एमआरटी म्युझिकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने केलेली ही बेकायदेशीर कृत्ये कायद्याचे नियम, व्यक्ती आणि संस्थांच्या अधिकारांची अवहेलना आहे.
न्यायालयाने खाते ब्लॉक करण्याचे आदेश दिले
या प्रकरणावर न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याच्या वतीने सीडीच्या माध्यमातून हे सिद्ध झाले आहे की गाण्याचे मूळ व्हर्जन काही बदलांसह वापरले गेले आहे. या प्रकारचे मार्केटिंग व्हिडीओ पायरसीला प्रोत्साहन देतात. न्यायालयाने आपल्या आदेशात ट्विटरला दोन हँडलवरून तीन लिंक काढून टाकण्याचे निर्देश दिले. तसेच काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले.
काँग्रेसने निवेदन जारी केले
या प्रकरणी काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर काँग्रेसच्या ट्विटर हँडल आणि भारत जोडो यात्रेच्या विरोधात बंगळुरू न्यायालयाच्या आदेशाची आम्हाला माहिती मिळाली. आम्हाला न्यायालयाच्या कामकाजाची माहिती दिली नाही. आदेशाची प्रतही प्राप्त झालेली नाही. आम्ही आमची बाजू कायदेशीर मांडणार आहोत.
मीडिया से यह पता चला है कि बेंगलुरु कोर्ट ने @INCindia और 'BJY' के सोशल मीडिया हैंडल को ब्लॉक करने का आदेश दिया है।
— Congress (@INCIndia) November 7, 2022
हमें इस कार्यवाही के बारे में सूचित नहीं किया गया, ना हम कोर्ट में उपस्थित थे, ना ही आदेश की कॉपी मिली है।
हम कानूनी सलाह ले रहे हैं।
भारत जोड़ो यात्रा जिंदाबाद!