एक्स्प्लोर
बेळगावात भररस्त्यात ओम्नी पेटली, सहाही प्रवासी सुखरुप
व्हॅन चालकासह सहा प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर गाडीतून धाव घेतल्यामुळे त्यांचे प्राण सुदैवाने वाचले.
![बेळगावात भररस्त्यात ओम्नी पेटली, सहाही प्रवासी सुखरुप Belgaum : Omni Van catches fire latest update बेळगावात भररस्त्यात ओम्नी पेटली, सहाही प्रवासी सुखरुप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/22164205/Belgaum-Omni-van-fire.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : बेळगाव शहरातील कित्तूर चन्नमा चौकात मारुती ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतला. व्हॅन चालकासह सहा प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर गाडीतून धाव घेतल्यामुळे त्यांचे प्राण सुदैवाने वाचले.
व्हॅनने पेट घेतल्याचं पाहताच पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलवलं. मात्र तोपर्यंत व्हॅन आगीत जळाली होती.
कोल्हापूरचे परशुराम जयवंत कागलकर आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी एम एच 15 डीसी 1139 या मारुती व्हॅनमधून बेळगावला आले होते. कित्तूर चन्नमा चौकात त्यांची व्हॅन बंद पडली. त्यांनी पुन्हा व्हॅन सुरु केली, मात्र काही मीटर अंतर गेल्यावर व्हॅनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
ओम्नी व्हॅन बाजूला थांबवून चालकासह सर्व जण लगेच खाली उतरले. त्याचवेळी व्हॅनने पेट घेतला. रस्त्यात व्हॅन पेटल्यामुळे काही काळ चन्नमा चौकात गोंधळ उडाला. जवळच बस स्टॉप असल्यामुळे तेथील लोकांनी घाबरुन बाजूला पळ काढला. पोलिसांनी तात्काळ एका बाजूची वाहतूक बंद करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)