![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Belgaum Elections 2021 Results: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव
Belgaum Loksabha By Elections 2021 Results: बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रतिस्पर्धी सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी 5240 मतांनी पराभव केला. मंगला अंगडी यांना 440327 मते तर सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाली.
![Belgaum Elections 2021 Results: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव Belgaum Final Results Election 2021 BJP Mangala Angadi wins Belgaum Lok Sabha by-election defeats Congress Satish Jarkiholi 5240 votes Belgaum Elections 2021 Results: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/02/6d10403a29226f0aa6720f64c5875a30_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Belgaum Loksabha By Elections 2021 Results: बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रतिस्पर्धी सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी 5240 मतांनी पराभव केला. मंगला अंगडी यांना 440327 मते तर सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना 117187 मते मिळाली.
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून क्षणाक्षणाला रंगत निर्माण झाली होती. मतमोजणी सुरू झाल्यावर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी काही फेऱ्यापर्यंत दोन हजार मतांपर्यंत आघाडी घेतली होती पण नंतर भाजपच्या मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली. नंतर पुन्हा सतीश जारकीहोळी यांनी बऱ्याच फेऱ्या आघाडी टिकवली होती. त्यामुळे चित्र बदलून गेले होते.
मतमोजणी अखेरच्या टप्प्यात असताना पुन्हा भाजपच्या मंगला अंगडी यांनी आघाडी घेवून विजयश्री संपादन केली. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी देखील सव्वा लाख मते घेवून राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मराठी मते कशी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरतात हे दाखवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)