एक्स्प्लोर
विद्युत विभागाची हलगर्जी, तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. कल्लोळी कुटुंबीय सकाळी शेतावर निघाले असताना तुटून पडलेल्या विद्युतभारित तारांचा स्पर्श या चौघा जणांना झाला.

फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस
बेळगाव : विद्युतभारित तारांचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांना प्राण गमवावे लागले. बेळगावातील रामदुर्ग तालुक्यातील के. तिम्मापूरमध्ये ही घटना घडली. चौघांसोबतच बैलजोडीचा मृत्यू झाला. 35 वर्षीय रेवप्पा कल्लोळी, त्यांची 30 वर्षीय पत्नी रत्नम्मा, आठ वर्षांचा मुलगा सचिन आणि भावाचा मुलगा कृष्णा यांना या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. काल संध्याकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. विद्युत खात्याच्या कार्यालयाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला जात आहे. कल्लोळी कुटुंबीय सकाळी शेतावर निघाले होते. त्यावेळी तुटून पडलेल्या विद्युतभारित तारांचा स्पर्श या चौघा जणांना झाला. विद्युत विभागाची हलगर्जी चार जणांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी वाचा























