New ITR Rules : रिटर्न फाईल करण्यापूर्वी 'या' गोष्टींची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या नवे नियम
आयकर विभागाने आयटीआर भरण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष 2021-22 (Assessment Year 2022-23) साठी विवरणपत्र भरण्यापूर्वी, सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा.
New ITR Rules : तुम्ही तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करणार असाल, तर काही गोष्टी तपशीलवार जाणून घेणे तुमच्यासाठी चांगले होईल. आयकर विभागाने आयटीआर भरण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष 2021-22 (Assessment Year 2022-23) साठी विवरणपत्र भरण्यापूर्वी, सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा.
कोणता बदल झाला आहे?
जर तुम्हाला भीती वाटत असेल की, नियम बदलल्यानंतर आयकर रिटर्न भरणे तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल, तर तसे अजिबात नाही. नियमात फार मोठे बदल झाले असे नाही. बाकी गोष्टी तशाच आहेत, तुम्हाला फक्त काही अतिरिक्त माहिती पुरवायची आहे. त्यासाठी फॉर्मच्या फॉर्मेटमध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला या बदलांची माहिती नसेल, तर तुम्हाला तुमचा ITR फॉर्म भरण्यात अडचण येऊ शकते.
पीएफ फंडावर व्याज
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात (EPF) तुमचे योगदान दरवर्षी अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्यावरील व्याजावर आता कर आकारला जाईल. तुम्हाला या व्याजाची संपूर्ण आणि योग्य माहिती ITR फॉर्ममध्ये द्यावी लागेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा ITR दावा रद्द केला जाईल.
मालमत्ता खरेदी किंवा विक्री
आयआरटी फॉर्ममध्ये, तुम्हाला कॅपिटल गेन्समध्ये खरेदी किंवा विक्री केलेल्या मालमत्तेची माहिती द्यावी लागेल. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी केली किंवा विकली असेल तर संपूर्ण तपशील द्यावा लागेल. तुम्ही हा करार कोणत्या तारखेला केला हे देखील सांगणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे घर दुरुस्त केले असेल किंवा त्यात कोणतेही नवीन काम केले असेल तर ही माहिती देखील दरवर्षीच्या आधारे द्यावी लागेल. या वेळेपासून, तुम्हाला मालमत्तेची खरेदी करताना इंडेक्स कॉस्ट तसेच मार्केट रेट समावेश करावा लागेल.
रेसिडेंशियल स्टेटस
नवीन नियमांनुसार आता ITR भरताना रेसिडेंशियल स्टेटस सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही ITR-2 किंवा ITR-3 फॉर्म भरत असाल, तर तुम्ही भारतात किती काळ वास्तव्य करत आहात हे नमूद करावे लागेल.
परदेशात मालमत्ता किंवा उत्पन्न असल्यास
जर तुम्ही परदेशात मालमत्ता बांधली असेल किंवा परदेशात असलेल्या कोणत्याही मालमत्तेतून भाड्याने किंवा व्याजाच्या स्वरूपात कोणतेही उत्पन्न मिळवले असेल, तर ही माहिती ITR भरताना द्यावी लागेल. यासाठी ITR-2 किंवा ITR-3 फॉर्म देखील वापरला जाईल. जरी तुम्ही देशाबाहेर मालमत्ता विकली असली तरी तुम्हाला ही माहिती ITR फाइलिंगच्या वेळी द्यावी लागेल. ही मालमत्ता कुठे होती आणि तिचा खरेदीदार कोण होता हेही सांगावे लागेल.
जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला हे तपशील द्यावे लागतील
तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला त्याबद्दल ITR फॉर्ममध्ये सांगावे लागेल. निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनचा स्त्रोत सांगावा करावा लागेल. पेन्शन कुठून मिळते, माहिती द्यावी लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या
- Tiranga Interesting Facts : देशात फक्त एकाच ठिकाणी तिरंग्याची निर्मिती अन् 18 वेळा गुणवत्ता तपासणी! जाणून घ्या तिरंगा निर्मितीच्या 5 रंजक गोष्टी
- Bihar : प्राध्यापकाचा प्रामाणिकपणा; विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं 23 लाखांचा पगार केला परत!
- Lalu Yadav Health Update : खांद्याच्या दुखापतीमुळं हलणंही अशक्य, लालू यादव यांची प्रकृती गंभीर; दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु
- TMC Leader Shot Dead : पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या, अंदाधुंद गोळीबार करून हल्लेखोर पळाले