एक्स्प्लोर

TMC Leader Shot Dead : पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या, अंदाधुंद गोळीबार करून हल्लेखोर पळाले

TMC Leader Shot Dead : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

TMC Leader Shot Dead : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले. 

काही गुंडांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार करून पळ काढला. गोळी लागल्याने टीएमसी नेता आणि त्यांचे दोन साथीदार जागीच ठार झाले. सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काडतुसे आणि बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. स्वपन माळी हे टीएमसीचे नेते असून स्थानिक पंचायतीचे सदस्यही होते. कॅनिंग पश्चिम येथील टीएमसी आमदार परेश राम दास यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी प्रथम टीएमसी नेत्यासह तीन जणांना गोळ्या घातल्या आणि नंतर शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तिघा जणांची हत्या झाली असून तपास सुरू आहे. स्वपन माळी, झंटू हलदर आणि भूतनाथ प्रामाणिक अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळी ९ च्या सुमारास हे तिघे स्थानिक टीएमसी कार्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. 21 जुलै रोजी दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसीची रॅली होणार आहे. त्याच्या तयारीसाठीच स्वपन माळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कार्यालयात जात होते. 

खुनाची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती

केनिंगच्या गोपाळपूर पंचायतीचे ते सदस्य होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकल थांबवली होती, त्यात स्वपन माझींसह तिघेजण होते. आधी त्यांनी माझी यांना गोळ्या घातल्या आणि नंतर हलदर आणि प्रामाणिक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही गोळ्या घातल्या. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

आमदार परेश राम दास म्हणाले, 'माझी मंगळवारी रात्री माझ्याकडे आले आणि म्हणाले की माझी हत्या होऊ शकते. मी त्यांना गुरुवारी दुपारी येण्यास सांगितले. जेणेकरुन, मला पोलिसांशी बोलता येईल आणि सुरक्षा व्यवस्था करता येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget