एक्स्प्लोर

BBC Documentary Row : बीबीसी डॉक्युमेंटरीवरील केंद्राच्या बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान; 6 फेब्रुवारीला सुनावणी

Supreme Court Hearing On BBC Documentary: मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला माहितीपटाचे दोन्ही भाग एकत्र पाहण्याची विनंती केली आहे.

Supreme Court Hearing On BBC Documentary:  इंडिया द मोदी क्वेश्चन..ही बीबीसीची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यापासूनच भारतात वादात आहे. केंद्र सरकारनं ती युट्युबवरुन हटवली, ट्विटरवर कुणाला त्याबाबत प्रसारास बंदी करण्यात आली आहे.  केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीवरील बंदीचे प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचले आहे. माहितीपटावरील बंदी उठवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.  याचिकाकर्ता वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीची विनंती केली आहे. या याचिकेवर चीफ जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी सोमवारी सुनावणीचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, कोर्टात उपस्थित असणारे वरिष्ठ वकिल सी यू सिंह यांनी देखील या विषयी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेचा उल्लेख केला आहे. दुसरी याचिकेत डॉक्युमेंटरी संदर्भात एन राम आणि प्रशांत भूषण यांनी केलेली ट्वीट हटवण्याची मागणी केली आहे. तसेच अजमेरसह काही विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर डॉक्युमेंटरीच्या स्क्रिनिंगचे आयोजन केल्यामुळे निलंबीत करण्यात आले आहे चीफ जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी 6 फेब्रुवारीला ही माहिती सादर करण्यास सांगितले आहे. 

मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला माहितीपटाचे दोन्ही भाग एकत्र पाहण्याची विनंती केली आहे. या माहितीपटाच्या आधारे 2002 च्या गुजरात दंगलीला जबाबदार असलेल्यांवर कारवई करण्याची मागणी देखील याचिकेत केली आहे. तसेच देशभरात डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग करणाऱ्या लोकांवर देशात दबाव  आणला जात आहे.  

वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.  ते म्हणाले, कलम 19(1)(2) नुसार नागरिकांना 2002 च्या गुजरात दंगलींवरील बातम्या, तथ्ये आणि अहवाल पाहण्याचा अधिकार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचे आहे.

 इंडिया द मोदी क्वेश्चनवरुन एवढा वाद का सुरू आहे?

  • 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी बीबीसीची ही 59 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे
  •  ब्रिटीश फॉरेन ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा माहितीपट तयार करण्यात आलाय
  •  भाजप समर्थकांचं म्हणणं आहे की, सुप्रीम कोर्टानं याबाबत एकदा निर्णय दिल्यानंतर विदेशी मीडिया अजूनही यात मोदींना अडकवू पाहतोय
  • तर दुसरीकडे बीबीसी आपल्या माहितीपटावर ठाम आहे, सर्व मतांना स्थान देऊन भारताच्या इतिहासातली एका महत्वाच्या घटनेवर हा माहितीपट बनवल्याचा त्यांचा दावा आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget