Bank Holiday November 2021: नोव्हेंबर महिन्यात बँका 'या' दिवशी बंद राहतील
बँकेशी संबंधित आवश्यक कामं असतील तर ती लवकर करुन घ्या कारण बॅंका या महिन्यात जवळपास 17 दिवस बंद असणार आहेत. या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील पाहुयात.
November 2021 Bank Holiday List: बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्या माहिती असणे गरजेचं आहे. बँकेशी संबंधित आवश्यक कामं असतील तर ती लवकर करुन घ्या कारण बॅंका या महिन्यात जवळपास 17 दिवस बंद असणार आहेत. या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील पाहुयात.
या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यात 17 दिवसांची सुट्टी असेल. या 17 सुट्ट्यांमध्ये 4 रविवारी साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे, तर दुसर्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. याशिवाय बँक कामगारांच्या संपामुळेही बँकेचं काम बंद राहणार आहे.
या दिवशी बँका बंद राहतील
1 नोव्हेंबर - कन्नड राज्योत्सव आणि कुटमुळे बंगळूरू आणि इंफालमधील बँका बंद राहतील
3 नोव्हेंबर - नरक चतुर्दशीला बंगळूरुमधील बँका बंद राहतील
4 नोव्हेंबर - लक्ष्मीपूजनमुळे बंगळूरु वगळता देशातील सर्व बँकाना सुट्टी राहणार आहे.
5 नोव्हेंबर - दिवाळी, गोवर्धन पूजा, विक्रम संवत असल्याने अहमदाबाद, बेलापूर, बंगळूरू, डेहराडून , गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई आणि नागपूरमधील बँका बंद राहणार आहे
6 नोव्हेंबर - भाऊबीज, चित्रगुप्त जयंतीमुळे गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमलातील बँका बंद राहणार आहे
10 नोव्हेंबर - छठ पूजा, सूर्य षष्ठी, डाला छठनिमित्ताने पटणा आणि रांची मधील बँका बंद राहणार आहे,
12 नोव्हेंबर - वांगला महोत्सवाच्या निमित्ताने शिलॉंगमधील बँक बंद राहणार आहे
19 नोव्हेंबर - गुरू नानक जयंती, कार्तिकी पौर्णिमेमुळे बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रांची, रायपूर, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहणार आहे.
22 नोव्हेंबर - कनकदास जयंतीमुळे बंगळूरुतील बँका बंद असणार आहे.
23 नोव्हेंबर - सेंग कुत्सनेम निमित्ताने शिलॉंग येथील बँका बंद असणार आहे.
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम बंद
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेचे कामकाज बंद असते. या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
रविवारी बँक बंद
महिन्याच्या प्रत्येक रविवारी बँका बंद असतात. नोव्हेंबर महिन्यातील 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला देशातील सर्व शहरातील बँका बंद राहणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्या एकूण 17 दिवस बँक बंद असणार आहे.