एक्स्प्लोर
कैलाश खैर, बाबूल सुप्रीयोच्या गाण्यावर रामदेव बाबांचा डान्सिंग योगा
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय योग दिनाची रंगीत तालीम करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी राजपथावर काल दिवसभर योगाचे धडे घेतले. या रंगीत तालमीला हजारो योगप्रेमींनी हजेरी लावली. या पूर्वतयारीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.
प्रख्यात गायक कैलाश खैर यांच्या सुरांवरही बाबा रामदेव यांनी योगा केला. इतकंच नाही, तर गायक आणि बंगालमधले खासदार बाबुल सुप्रियो यांनीही रामदेव बाबांच्या योगाला सुरेल साथ दिली.
आगामी 21 तारखेला जगभरात योगा दिवस साजरा केला जाणार आहे. याच योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम हा राजपथावर होणार आहे. दरम्यान, सुरु असलेल्या तालमीच्या वेळेस केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, खासदार मिनाक्षी लेखी, मनोज तिवारी यांनीही सराव केला. तसेच योगबद्दल दाखवलेल्या उत्साहाबद्दल व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीकरांचंही तोंडभरुन कौतुक केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement