एक्स्प्लोर

Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा

2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चंदिगड : 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांनी स्वतः रोहतकच्या सुनारिया कारागृहात जाऊन शिक्षा ठोठावली. साध्वी बलात्कार प्रकरणी 25 ऑगस्टला राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं होतं. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. काय झालं कोर्टात? न्यायाधीश जगदीप सिंग यांनी सुरुवातीला दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानंतर बाबा राम रहीमला कोर्टरुममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी कोर्टरुममध्ये सीबीआयचे दोघे जण, बचाव पक्षातर्फे तिघे जण, दोन स्टाफ सदस्य आणि न्यायाधीश जगदीप सिंह इतक्याच व्यक्ती उपस्थित होत्या. बाबा राम रहीमने न्यायाधीशांकडे दयेची याचना केली. कोर्टरुममध्ये बाबा राम रहीम हात जोडून उभा राहिला होता. त्यावेळी बाबाला रडू कोसळलं. राम रहीम समाजसेवक आहे, त्यांना कमीत कमी शिक्षा द्या, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांकडे केली. आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केलं, स्वच्छता मोहीम, रक्तदान यासारख्या समाजसेवी योजना राबवल्या, अशा कामांचा उल्लेख करत राम रहीमला माफ करण्याची विनवणीही वकिलांनी कोर्टाकडे केली. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जगदीप सिंग यांनी निकालाचं वाचन सुरु केलं. साध्वीवरील बलात्कार प्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर बाबा राम रहीमला मोठा धक्का बसला. त्याच मनस्थितीत तो कोर्टातील जमिनीवर बसून रडत बसला होता. जेल वॉर्डन आणि स्टाफने त्याला चापट मारुन उठवलं. राम रहीमच्या वैद्यकीय तपासणीत प्रकृती सामान्य असल्याचा अहवाल आला. त्यानंतर राम रहीमला जेलमध्ये नेण्यात आलं. बाबाला कैद्यांचा युनिफॉर्म देऊन जेलमधील कोणत्या सेलमध्ये त्याची रवानगी करायची, हे ठरवण्यात येईल. बाबा राम रहीमला शिक्षा सुनावण्यापूर्वीच हरियाणातील सिरसामध्ये डेरा समर्थकांची गुंडगिरी पाहायला मिळाली. सिरसामध्ये काही जणांनी दोन गाड्या पेटवल्या. कोर्टाच्या निर्णयानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मुख्य सचिव, गृह सचिव, पोलिस महासंचालक हजर राहणार आहेत. शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंग विशेष हेलिकॉप्टरने रोहतकला रवाना झाले होते. रोहतक शहराबाहेर असलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरल्यानंतर न्यायमूर्ती कारागृहात दाखल झाले. सुनावणीसाठी रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये विशेष कोर्टरुम तयार करण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पंजाब, हरियाणा आणि दिल्ली सरकारसमोर आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर जर पुन्हा समर्थकांनी हिंसा सुरु केली, तर त्यांना थेट गोळ्या झाडण्याचे आदेश राज्य सरकारनं पोलिसांना दिले आहेत. राम रहीमकडे कोणते पर्याय? राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल. तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणात खबरदारी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे हरियाणातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर पंजाबच्या 13 जिल्ह्यातील शाळा-कॉलजेसही सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली. 13 जिल्हे वगळता पंजाबमध्ये इतर ठिकाणची शाळा कॉलेजेस सुरु आहेत. शाळा कॉलेज बंद असली तरी हरियाणा-पंजाब मधील सरकारी कार्यालयं मात्र सुरुच आहेत. जिथे राम रहीमचा सच्चा डेरा आहे त्या सिरसा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमधील इंटरनेट सेवा उद्या सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचीही एक बैठक पार पडली. यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गृहमंत्रालय सतत हरियाणाच्या डीजीपींच्या संपर्कात आहे. गरज पडल्यास निम लष्करी दल आणि सैन्याचीही मदत घेतली जाईल, अशी माहिती आहे. बाबा राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये मोठा धुडगूस घालण्यात आला होता. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला तर लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं. काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी काही साध्वींचंही लैंगिक शोषण झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्ट 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 : बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. 28 ऑगस्ट 2017 : 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली LIVE UPDATE :
  • कोर्टाच्या निर्णयानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तातडीची बैठक बोलावली
  • बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा
  • सिरसामध्ये दोन गाड्या पेटवल्या, डेरा समर्थकांची गुंडगिरी
  • दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, न्यायाधीश जगदीप सिंग यांच्याकडून निकालाचं वाचन सुरु
  • आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केलं, आम्हाला माफ करा : राम रहीमच्या वकिलांची मागणी
  • बाबा राम रहीमच्या वकिलांकडून स्वच्छता मोहीम, रक्तदान इ. समाजसेवी कामांचा उल्लेख
  • राम रहीम समाजसेवक आहे, त्यांना कमीत कमी शिक्षा द्या – वकिलांची मागणी
  • कोर्टरुममध्ये बाबा राम रहीम हात जोडून उभा, बाबाच्या डोळ्यात पाणी
  • बाबा राम रहीमकडून न्यायाधीशांकडे दयेची याचना
  • कोर्टरुममध्ये 2 जण सीबीआयचे, 3 जण बचाव पक्षाचे, 2 स्टाफ सदस्य आणि न्यायाधीश जगदीप सिंह उपस्थित
  • बाबा राम रहीमला काही मिनिटांत शिक्षा सुनावणार
  • राम रहीमला जास्तीत जास्त शिक्षा द्या, सीबीआयच्या वकिलांची मागणी
  • बाबा राम रहीमला कोर्टरुममध्ये बोलावलं
  • न्यायाधीश जगदीप सिंग यांच्याकडून दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ
संबंधित बातम्या :

बाबा राम रहीमचा फैसला आज, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी

हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?

न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!

राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं

गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?

व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला

बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली

बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू

भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन

अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात

राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar : माझी कामं मी केली म्हणून सांगतात, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणाSanjay Raut vs Sanjay Shirsat : संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तरDevendra Fadnavis Speech Kolhapur : राहुल गांधींच्या बोगीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीABP Majha Headlines : 3 PM  :27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Embed widget