मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञासिंग ठाकूरसारखे लोक तयार होत नाहीत, सपा नेते आजम खान यांच्या वक्तव्याने वाद
नथुराम गोडसेच्या विचारांचा प्रचार करणाऱ्यांना आधी लोकशाहीचे शत्रू घोषित करा, तसेच दहशवादी कारवायांमध्ये दोषी आढळलेल्या लोकांना बक्षिस दिलं जाणार नाही, याचं आश्वासन द्या अशी मागणी आजम खान यांनी केली.
नवी मुंबई : समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशच्या रामपूरचे खासदार आजम खान यांनी मदरशांसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मदरशांमध्ये महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर सारखे लोक तयार होत नाहीत. मोदी सरकारच्या मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या योजनेवर प्रतिक्रिया देताना आजम खान यांनी ही प्रतिक्रिया दिला आहे.
मोदी सरकारच्या पुढील पाच वर्षात मदराशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्याच्या योजनेवर बोलताना आजम खान यांनी म्हटलं की, मोदी सरकार स्कॉलरशीप देईल तेव्हा देईल, त्याआधी मदरशांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन द्यावं. इतर शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिलं जातं, ते मदरशांमधील विद्यार्थ्यांनाही द्यावं.
A Khan: Madrasas don't breed a nature like that of Nathuram Godse or a personality like Pragya Thakur. See that first, announce that those propagating thoughts of Nathuram Godse will be declared enemies of democracy, those convicted for terror activities won't be rewarded. (11.6) https://t.co/R5IZq9QtNf
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2019
मदरशांमध्ये नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर सारख्या मानसिकतेचे लोक जन्म घेत नाहीत. नथुराम गोडसेच्या विचारांचा प्रचार करणाऱ्यांना आधी लोकशाहीचे शत्रू घोषित करा, तसेच दहशवादी कारवायांमध्ये दोषी आढळलेल्या लोकांना बक्षिस दिलं जाणार नाही, याचं आश्वासन द्या अशी मागणी आजम खान यांनी केली.
मोदी सरकारने मदरशांच्या चेहरा-मोहरा बदण्याच्या विचारात आहे. पुढील पाच वर्षात मदरशांमधील विद्यार्थ्यांनासाठी 3E म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि एम्पावरमेंट ही योजना राबवली जाणार आहे. पुढील महिन्यापासून यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.