एक्स्प्लोर
जम्मू-काश्मिरमधील शोपियामध्ये सीआरपीएफवर ग्रेनेड हल्ला
श्रीनगर: दक्षिण काश्मिरमधील शोपिया जिल्ह्यात आज सीआरपीएफच्या गस्तीवरच्या पथकावर ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान आणि दोन महिलांसह आठजण जखमी झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात एकूण 8जण जखमी झाले, या जखमींना शोपियाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मोहीम उघडली आहे.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मिरच्या पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी ईडीआयचा आसरा घेत, तिथून फायरिंग करत आहेत.Two CRPF jawans and four civilians injured in a grenade attack in Shopian district of Jammu and Kashmir. pic.twitter.com/oPcmxiJMxs
— ANI (@ANI_news) October 11, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement