एक्स्प्लोर

Assam Floods Update : आसाममध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक बेघर

Assam Floods Update: आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालेय.

Assam Floods Update: आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालेय. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळे लाखो लोकांना घरदार सोडावं लागत आहे. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल 186 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण बेपत्ता आहेत. आसाममधील 16 जिल्ह्यातील जवळपास 11 लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसलाय. 

पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान,  भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आलाय. नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक कसोशीने प्रयत्न करतेय. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

 बारपेटा भागात सर्वाधिक नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, बारपेटा, नागाव आणि कचर येथे पुराचा सर्वाधिक फटका बसला असून लाखो लोक प्रभावित झाले आहेत.  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कचारमधील सिल्चर आणि कामरूपमधील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली
आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं 79 रस्ते आणि पाच पुलांचं मोठं नुकसान झालं आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली.

पंतप्रधान काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून आसामला पुराच्या रूपात मोठी आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमंता जी आणि त्यांचा चमू  मदत आणि बचावासाठी रात्रंदिवस काम करत आहे.  वेळोवेळी तिथल्या बर्‍याच लोकांशी याबद्दल माझे बोलणे सुरु असते. मुख्यमंत्र्यांशीही संवाद सूरु असतो. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी एकत्र काम करत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 February 2025Prajakta Mali News : प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, प्राजक्ताचे सहकारी कार्यक्रम सादर करणारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 February 2025  दुपारी 3 च्या हेडलाईन्सAmol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv Sena

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget