"अरविंद केजरीवाल कोमामध्ये जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचाही धोका"; आप खासदाराच्या दाव्यानं खळबळ
New Delhi News: एबीपी न्यूजच्या हाती अरविंद केजरीवाल यांचा वैद्यकीय अहवालही मिळाला आहे. यामध्ये त्याचं वजन कमी झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
Arvind Kejriwal Health News: नवी दिल्ली: तिहार तुरुंग (Tihar Jail) प्रशासनाकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या वैद्यकीय अहवालावर आम आदमी पार्टीकडून (Aam Aadmi Party) प्रतिक्रिया समोर आली आहे. तिहार तुरुंगात शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची कबुली दिल्याचे आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल झोपेत असतानाच कोमात जाऊ शकतात. शुगर लेव्हल कमी झाल्यानं ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असतो. तिहार जेलच्या अहवालानुसार, अरविंद केजरीवालांचं वजनही कमी झालं आहे.
एबीपी न्यूजच्या हाती अरविंद केजरीवाल यांचा वैद्यकीय अहवालही मिळाला आहे. यामध्ये त्याचं वजन कमी झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वजनाबाबत आप नेते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. केजरीवाल यांचे 8.5 किलो वजन कमी झाल्याचा दावा दिल्ली सरकारचे मंत्री, आपचे खासदार आणि इतर सातत्यानं करत आहेत. या संदर्भात तिहार जेलच्या अधीक्षकांनी दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिलं आहे.
सीएम केजरीवाल यांच्या वजनाबाबत आप नेते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांचं तुरुंगात असताना 8.5 किलो वजन कमी झाल्याचा दावा आम आदमी पक्षाचे मंत्री, खासदार आणि इतर सातत्यानं करत आहेत. यानंतर तिहार जेलच्या अधिक्षकांनी अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत सुरू असलेल्या दाव्यावर दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिलं आहे.
अरविंद केजरीवाल यांचं 8.5 किलो वजन घटलं?
तुरुंग अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल 1 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा तिहार तुरुंगात आले होते. त्यावेळी त्यांचं वजन 65 किलो होतं. अरविंद केजरीवाल यांनी 10 मे रोजी तिहार कारागृह सोडलं त्यावेळी त्यांचं वजन 64 किलो होतं. 2 जून रोजी त्यानं तुरुंगात आत्मसमर्पण केलं तेव्हा त्याचं वजन 63.5 किलो होतं. सध्या त्यांचं वजन 61.5 (14 जुलै) किलो आहे.
तुरुंग अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी जेवण जेवल्यानं किंवा कमी कॅलरी घेतल्यानंही वजन कमी होऊ शकतं. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अरविंद केजरीवाल यांची दररोज तपासणी केली जाते. याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल याही वैद्यकीय मंडळाशी सल्लामसलत करताना उपस्थित असतात.
आप आमदारांचे दावे बिनबुडाचे
दिल्ली सरकारचे काही मंत्री, एक विद्यमान खासदार आणि आम आदमी पक्षाच्या इतर आमदारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बिनबुडाचे आरोप केल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तुरुंग प्रशासनाला घाबरवण्याच्या उद्देशानं खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.