एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अर्जुन खोतकर यांचं मंत्रिपद आणि आमदारकी तूर्तास शाबूत राहिलं आहे. शिवाय, खोतकरांचा मतदानाचा अधिकारही अबाधित राहिला आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. प्रकरण काय आहे? विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्यावरील सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देत खोतकरांना दिलासा दिला आहे. अर्जुन खोतकर हे 2014 मध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून केवळ 286 मतांनी विजयी झाले होते. कोण आहेत अर्जुन खोतकर? - अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. - 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते. - सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत. -आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते. 2014 ची जालना विधानसभेची निवडणूक जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, भाजपकडून अरविंद चव्हाण, बसपाकडून अब्दुल रशीद अशा महत्त्वाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 296 मतांनी विजय मिळवला. त्यांना 45078 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. गोरंट्याल यांना 44782 मतं मिळाली होती. भाजपचे अरविंद चव्हाण 37,591 मते मिळाली, तर बसपा उमेदवार अब्दुल रशीद यांनी 36,350 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.

संबंधित बातम्या :

अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget