एक्स्प्लोर
Advertisement
आता पार्टी फंडवर गप्प का, अण्णांचा केजरीवालांना टोला
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या फंडिंगचा तपशील वेबसाईटवरुन हटवल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला आहे.
भाजप आणि काँग्रेसवर तुम्ही पार्टी फंडवरुन टीका केली होती, पण आता तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक, असा सवाल अण्णांनी केजरीवालांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
पार्टीला फंड देणाऱ्यांची यादी जून महिन्यापासूनच 'आप'च्या वेबसाईटवरुन हटवण्यात आली आहे. केजरीवालांनी पार्टी फंडिंगची माहिती नेहमी सार्वजनिक ठेवू, असं आश्वासन दिलं होतं. मग त्याचं आता काय झालं, असा खोचक सवाल अण्णांनी केलाय.
तुमच्या बोलण्यात एक आणि कृतीत एक असल्याचं आपल्याला दुःख असल्याचंही अण्णांनी पत्रात म्हटलं आहे. देशात बदल आणण्यासाठी बोलणं आणि कृती एक असणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. तुम्ही मला आणि समाजाला देशात बदल आणण्याचं वचन दिलं होतं. पण हे वचन तुम्ही विसरल्याचं दुःख असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement