Ankita Murder Case : अंकिताचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्ट मधून समोर आलं सत्य
Ankita Murder Case : एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कसून पाहणी केली. शिवाय एम्समधून अंकिताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आजड प्राप्त झाला असून तो नातेवाईकांना दाखवण्यात आला आहे.
Ankita Murder Case : उत्तराखंडमधील अंकिता भंडारीच्या हत्येबाबत रोज नव-नवीन माहिती पुढे येत आहे. त्यातच आता अंकिताचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टममध्ये अंकिताचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबरोबरच अंताच्या शरीरावर चार ते पाच जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. रविवारी अंकितावर अंत्यसंस्कार होणार होते, पण प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार थांबवले होते आणि कुटुंबीयांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. मात्र, नंतर कुटुंबीयांनी अंकितावर अंत्यसंस्कार केले.
झारखंडमधील 19 वर्षीय अंकिता भंडारी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. शनिवारी अंकिताचा मृतदेह ऋषिकेशमधील कालव्यात सापडला. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून भाजप नेता पुलकित आर्यसह तिघांना पोलिसांनी अटक केली.
ज्या रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची ते रिसॉर्ट पुलकित आर्य याचे आहे. पुलकित आर्य हा भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी एसआयटीने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, अंकिता भंडारीच्या हत्येशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 सप्टेंबर 2022 रोजी रेणुका देवी, पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्था, उत्तराखंड यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
एसआयटीकडून तपास सुरू
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कसून पाहणी केली. शिवाय एम्समधून अंकिताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आजड प्राप्त झाला असून तो नातेवाईकांना दाखवण्यात आला आहे. घटनास्थळावरील सर्व पुरावे तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर इत्यादी इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचे विश्लेषण आणि सखोल अभ्यास केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार, रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे एसआयटीच्या वतीने सांगण्यात आले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेच्या दिवशी रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांची यादी मिळाल्यानंतर सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींकडून महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी पोलीस कोठडी मिळविण्याची कार्यवाही सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या