एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमूलचं एक ट्विट, रेल्वेकडून अटर्ली-बटर्ली पार्सल घेऊन पहिली खेप रवाना
रेल्वेकडून पहिल्यांदाच ट्विटरवरमुळे अमूलची अटर्ली-बटर्ली उत्पादन देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी सुरु झाली आहे. रेल्वे आणि अमूलकडून ट्विटरद्वारे याबाबत विचारण्यामुळे अमूलच्या उत्पादनांची रेफ्रिजरेटेड पार्सलची पहिली खेप रवाना झाली.
नवी दिल्ली : रेल्वेने आत्तापर्यंत ट्विटरवरुन अनेक प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण केलं आहे. पण रेल्वेकडून पहिल्यांदाच ट्विटरवरमुळे अमूलची अटर्ली-बटर्ली उत्पादन देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी सुरु झाली आहे. रेल्वे आणि अमूलकडून ट्विटरद्वारे याबाबत विचारण्यामुळे अमूलच्या उत्पादनांची रेफ्रिजरेटेड पार्सलची पहिली खेप रवाना झाली.
वास्तविक, अमूल कंपनीने जवळपास सप्टेंबरमध्ये भारतीय रेल्वेला ट्विट करुन देशाच्या विविध भागात आपली उत्पादनं पोहोचवण्यासाठी रेल्वे सेवा वापरासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता.
अमूलने यासाठी 23 सप्टेंबर रोजी ट्वीट करुन म्हटलं होतं की, “भारतात अमूलची उत्पादनं पाठवण्यासाठी अमूल डेअरी रेल्वेच्या रेफ्रिजरेटेड पार्सल व्हॅनचा वापर करु इच्छिते, यावर काही उपाय सुचवावा.”@RailMinIndia, Amul is interested in using refrigerated parcel vans to transport Amul Butter across India. Request to please advise.
— Amul.coop (@Amul_Coop) October 23, 2017
Railways Utterly Butterly commitment is fulfilled:Refrigerated parcel van (Temperature set at 3 degree centigrade) loaded with Amul Butter from Palanpur to Palwal dispatched at 8.55 AM today https://t.co/eG2zIfbE4c — Ministry of Railways (@RailMinIndia) November 11, 2017त्यावर रेल्वेने अमूलच्या उत्तर देताना रिट्वीट करुन म्हटलं की, “भारतीय रेल्वेला अमूलची ‘अटर्ली बटर्ली द टेस्ट ऑफ इंडिया’ उत्पादनं प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने नाश्वंत पदार्थ उदाहरणार्थ : फळं, भाजीपाला, मांस आणि चॉकलेटच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड सेवा सुरु केली होती. पण ही सेवा काही ठराविक मार्गांवरच उपलब्ध आहे.” रेल्वेने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर अमूलची पहिली खेप 11 नोव्हेंबर रोजी रवाना झाली. अमूलची ही पहिली खेप रवाना झाल्यानंतर कंपनीने रेल्वेचे आभार मानले आहेत.
First refrigerator van with 17 MT #Amul Butter being flagged off from Palanpur to Delhi with our milk train. Thanks @RailMinIndia for the prompt action. pic.twitter.com/ERC5Fh0CNo — Amul.coop (@Amul_Coop) November 11, 2017अमूलने ट्विटरवरुन आभार मानताना म्हटलंय की, “17 मॅट्रिक टन अमूल लोण्याच्या पार्सलचा पहिला डबा पालनपूर ते दिल्लीसाठी रवाना झाला. अमूलच्या प्रस्तावावर भारतीय रेल्वेने तत्काळ पावलं उचलल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement