एक्स्प्लोर
महात्मा गांधी चतुर बनिया, भाजपाध्यक्ष अमित शाहांचं वादग्रस्त वक्तव्य
रायपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी महात्मा गांधींना चतुर बनियाची उपमा दिली आहे. रायपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ते बोलत असताना, शहा भाजप आणि काँग्रेस पक्षांमधला फरक सांगत होते. पण यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख चतुर बनिया म्हणून केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
काँग्रेसच्या स्थापनेबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले की, ''काँग्रेस पक्ष हा केवळ भारताच्या स्वातंत्र्यापुरता स्थापन केला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बंद करण्यात यावा, अशी मागणी महात्मा गांधींनी केली होती.'' त्यांच्या याच विचारानं अमित शांहांनी त्यांना चतुर बनियाची उपमा दिली.
तसेच काँग्रेसला कसलीही वैचारिक आणि सैद्धांतिक बैठक नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ''काँग्रेसला कोणतीही वैचारिक बैठक नसून, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचं एक साधन होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी दूरदृष्टी दाखवत काँग्रेसला बरखास्त करण्यास सांगितलं होतं,'' असंही ते यावेळी म्हणाले.
अमित शाहांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच सत्तेचे व्यापारी, स्वातंत्र्यलढ्यालाही व्यापाऱ्याचं मॉडेल असल्याचं सांगत आहेत. वास्तविक, इंग्रजांनी संघाचा वापर स्पेशल पर्पज व्हीकलप्रमाणे केल्याचंही, त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच अमित शाह आणि मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. ते म्हणाले की, ''मी कोणत्या उद्देशाने गांधीजींचा उल्लेख बनिया असा केला, हे जे माझ्या सभेत उपस्थीत होते, त्या सर्वांना माहित आहे. रणदीप सुरजेवाल यांना गांधीजींच्या सिद्धांताबद्दल अनेक उत्तरं द्यायची आहेत.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement