एक्स्प्लोर

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे इनकमिंगला वेग, अमित शाह म्हणाले- निवडणुकीपर्यंत एकट्या पडणार दिदी

Amit Shah Bengal Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंच्या दौऱ्यात भाजपचं 'मिशन पश्चिम बंगाल' जोरात सुरु आहे. आतापर्यंत तृणमूल कॉंग्रेसचा एक खासदार आणि एक मंत्री आणि टीएमसी आणि इतर पक्षांचे 10 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. ममता बॅनर्जींचे विश्वासू समजले जाणारे शुभेन्दु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला आणखी एक मोठा झटका बसलाय. टीएमसीचे नाराज मंत्री शुभेन्दु अधिकारी यानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मिदनापूर येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या रॅलीदरम्यान तृणमूलचे मंत्री शुभेन्दु अधिकारी, खासदार सुनिल मंडल आणि  10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात सहा तृणमूलचे, दोन सीपीएमचे, कॉंग्रेस आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये राजकीय इनकमिंग जोरात सुरु आहे.

भाजपचं 'मिशन बंगाल' ममता बॅनर्जींच्या गडाला अशा प्रकारे भगदाड पाडल्यानंतर अमित शाहंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "काही बडबड्या नेत्यांनी सांगितलं की बंगालमध्ये तृणमूलला कोणीही हारवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी असं सांगितलं जायचं की बंगालमध्ये भाजप खातंही खोलू शकणार नाही. पण भाजपने या राज्यात 18 जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणूक येईपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या पडतील."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढं म्हणाले की, "भाजपमध्ये आज जे लोक प्रवेश करत आहेत त्यांनी 'मां माटी मानुष' या विचारांनी राजकारण सुरु केलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी 'मां माटी मानुष' ला टोलबाजी, परिवारवाद, तिरस्कारवाद आणि हप्ता वसूलीत रुपांतर केलं. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली. तेही एक पक्षांतरच होतं. आज सगळ्या पक्षातील चांगले लोक भाजपमध्ये येत आहेत. भाजप यावेळी 200 जागा जिंकेल आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल."

मोदींची प्रशंसा शुभेन्दु अधिकारी यांनी रॅलीला संबोधित करताना अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुफान प्रशंसा केली. त्यांनी मोदी हे देशाची 'आन बान शान' असल्याचं सांगितलं. शुभेन्दु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो ममता बॅनर्जींना एक झटका मानला जातोय. शुभेन्दु अधिकारी यांची बंगालमध्ये 25 ते 30 विधानसभा जागांवर पकड असल्याचं सांगितलं जातंय. त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी टीएमसीचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Embed widget