(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amartya Sen : नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्या मृत्यूची अफवाच; मुलगी म्हणाली, ते नेहमीप्रमाणे कामात व्यस्त
Amartya Sen News : डॉ. अमर्त्य सेन यांची तब्येत चांगली असून ते आपल्या कामात व्यस्त असल्याची माहिती त्यांची मुलगी नंदना देव सेन (Nandana Dev Sen) यांनी दिली आहे.
Amartya Sen News : प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen) यांच्याविषयी अफवा पसरत असून त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित असल्याची माहिती आहे. अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांची मुलगी नंदना देब सेन (Nandana Dev Sen) यांनी मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले आणि ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या (Nobel Prize Winner) क्लॉडिया गोल्डिन यांच्या नावाच्या एका ट्विटरवरून अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याची बातमी देण्यात आली होती. याच पोस्टचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेनेही सेन यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. ही अफवा पसरताच अमर्त्य सेन यांच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि लगेचच त्यांची मुलगी नंदना देब सेन हिने त्या वृत्ताचे खंडन केले. यानंतर पीटीआयने ही पोस्ट हटवली.
Deleting tweet on Amartya Sen based on a post from an unverified account in the name of Claudia Goldin. Actor Nandana Dev Sen denies news of death of her father, Nobel prize winner Amartya Sen.
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2023
काय म्हणाल्या नंदना देब सेन?
वडील अमर्त्य सेन यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना नंदना देब सेनने लिहिले, "मित्रांनो, तुम्हाला वाटत असलेल्या चिंतेबद्दल धन्यवाद, पण ही फेक न्यूज होती. बाबा पूर्णपणे बरे आहेत. आम्ही सर्वजण केंब्रिज येथे एक आठवडा घालवला. काल रात्री तिकडून येताना त्यांनी मला मिठी मारली. ते हार्वर्डमध्ये दर आठवड्याला दोन अभ्यासक्रम शिकवत आहेत. लिंगभेदावर ते एक पुस्तक लिहित असून त्याच्या कामात नेहमीप्रमाणे व्यस्त आहेत.
Friends, thanks for your concern but it’s fake news: Baba is totally fine. We just spent a wonderful week together w/ family in Cambridge—his hug as strong as always last night when we said bye! He is teaching 2 courses a week at Harvard, working on his gender book—busy as ever! pic.twitter.com/Fd84KVj1AT
— Nandana Sen (@nandanadevsen) October 10, 2023
अमर्त्य सेन कोण आहेत?
अमर्त्य सेन हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 1933 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांनी शांतिनिकेतन, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठात ते प्राध्यापक होते. याशिवाय त्यांनी जाधवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातही अध्यापन केले.
ही बातमी वाचा: