एक्स्प्लोर
अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे तूर्तास स्थगित
यात्रेकरुंचा पहिला जथ्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. मात्र जोरदार पावसामुळे यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
श्रीनगर : 'बम बम भोले' च्या जयघोषात अमरनाथ यात्रेसाठी निघालेला भाविकांचा दुसरा जथ्था जम्मूमध्ये दाखल झाला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेला काल म्हणजेच बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या जथ्थ्यामध्ये 330 महिला आणि 30 लहान मुलांसह 1904 भाविकांचा समावेश आहे. यात्रेकरुंचा पहिला जथ्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. मात्र जोरदार पावसामुळे यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रा पुढील 60 दिवस चालणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यातच सुट्ट्यांमुळे श्रीनगरमधील पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.
25 हजार सीआरपीएफ जवान, 15 हजार जम्मू आणि काश्मिर पोलिस भाविकांच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यंदा पहिल्यांदाच मोटारसायकल स्क्वॉडद्वारे सुरक्षा देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ भाविकांना प्राण गमवावे लागले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement