एक्स्प्लोर

All India Weather Update: उत्तर भारतात तापमानात वाढ, तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरणाची शक्यता

दिल्लीसह अनेक राज्यात थंडी कमी झाली आहे. हळूहळू तापमानात वाढ होत आहे.

All India Weather Update : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान वाढले आहे. त्याठिकाणी उन्हाळा सुरु झाला आहे. त्याचवेळी राजधानीतही होळीपूर्वी हवामानाचा मूड बदलू लागला आहे. दिल्लीसह अनेक राज्य थंडीला निरोप देत आहेत. हळूहळू सूर्यप्रकाश पडत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये सकाळी आणि रात्री थोडीशी थंडी जाणवत आहे. एकीकडे उत्तर भारतात दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असतानाच डोंगराळ भागात मात्र, रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळं दिवसभर थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. तर काही जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे.

महाराष्ट्रासह केरळ आणि काही राज्यात येत्या दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लडाख आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वेस्टर्न डिस्टर्बन्स कायम आहे. ज्याचा परिणाम आजूबाजूच्या राज्यांमध्ये दिसून येईल. हा विळखा हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. या कारणामुळे पंजाब, हरियाणा, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

एकीकडे उत्तर भारतात दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असताना, डोंगराळ भागात रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे दिवसभर थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पुढील 4 दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढू शकते. तर वायव्य भारतातील बहुतांश भागात कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पाटणा, बिहारमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असू शकते. दुसरीकडे, लेहमध्ये अजूनही थंडी पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लेहचे किमान तापमान उणे 3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. तर जम्मूचे किमान तापमान 12 अंश आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
Embed widget