एक्स्प्लोर

मुंबई-गोवा रिटर्न एअर तिकीट तब्बल 26 हजारांवर

विशेष म्हणजे या विमानांच्या वेळाही अडनिड्या आहेत, म्हणजेच फारशा सोयीस्कर नाहीत.

मुंबई : वर्षातला पहिला लाँग वीकेंड तोंडावर आल्यामुळे अनेकांनी बॅगा भरायला सुरुवात केली आहे. तुम्ही जर गोव्यात सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल आणि वेळ वाचवण्यासाठी विमानाची तिकीटं बुक करायच्या तयारीत असाल, तर आधी जरा खिसे चाचपडून पाहा. मुंबई-गोव्याचं परतीचं विमान तिकीट तब्बल 26 हजार रुपयांवर पोहचलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत विमान तिकीट बुक केलं नसेल, तर येत्या लाँग वीकेंडचं प्लानिंग तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारीची सुट्टी आणि शनिवार-रविवार असा लागून तीन दिवसांचा लाँग वीकेंड आला आहे. मात्र या दिवसात गोव्याला जाणं तुमच्या खिशाला चाट लावू शकतं. 26 जानेवारीला मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणि 28 जानेवारीला परतण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत आहे 26 हजार रुपये. विशेष म्हणजे या विमानांच्या वेळाही अडनिड्या आहेत, म्हणजेच फारशा सोयीस्कर नाहीत. त्यासाठी जाताना तुम्हाला रात्री दहा वाजताचं विमान पकडावं लागेल, तर परतण्यासाठी गोव्याहून भल्या पहाटे 4 वाजता निघावं लागेल. मुंबई-जोधपूर नॉनस्टॉप फ्लाईटचं विमान तिकीट उपलब्ध नाही. तर मुंबईहून पोर्ट ब्लेअरच्या नॉनस्टॉप फ्लाईटचं रिटर्न तिकीट तुम्हाला 42 हजारांना पडेल. मुंबईहून देहरादूनला विमानाने जाऊन येण्यासाठी तुम्हाला 32 हजार रुपये मोजावे लागतील. त्या तुलनेत मुंबई-दुबई रिटर्न तिकीट्स फक्त 22 हजारांपासून सुरु होत आहेत. त्यातही रात्री उशिरा किंवा पहाटे फ्लाईट पकडण्याची तुमची तयारी असल्यास अवघ्या 13 हजारात काम भागू शकतं. गेल्या आठवड्यात अनेक विमान कंपन्यांनी स्वस्त विमान प्रवासाच्या ऑफर दिल्या होत्या. मात्र लाँग वीकेंडचं बुकिंग करताना खिशाला कात्री लागण्याचीच चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget