Corona Vaccination | कोरोनाची लस घेतल्यानंतर एम्समधील कर्मचाऱ्याला अॅलर्जी
देशभरात शनिवारी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसींचं वितरण होताच, लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणाल ही मोहिम सुरु झाली. ज्यानंतर हे वृत्त समोर आलं.
नवी दिल्ली : शनिवारी देशभरात (Coronavirus) कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर आता लसीकरण प्रक्रियेशी निगडीत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्याचं निर्धारित केल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांचाही यात समावेश करण्यात आला. अशातच दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकालाही (Corona Vaccination) कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. ज्यानंतर आता या कर्मचाऱ्याला लसीमुळं अॅलर्जी झाल्याचं म्हटलं जात आहे. लस घेतल्यानंतर अॅलर्जीक रिअॅक्शन झाल्यामुळं आता या कर्मचाऱ्याला निरिक्षणाअंतर्गत ठेवण्यात आलं असून, डॉक्टर या गोष्टीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत.
लसीकरण मोहिमेदरम्यानच ओडिशा येथूनही अत्यंत महत्त्वाचं वृत्त समोर आलं. ओडिशा हे असं पहिलं राज्य ठरलं आहे, जिथं कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा थांबवण्यात आला आहे. ओडिशा प्रशासनानं लसीकरणाची ही मोहिम रविवारच्या दिवसापुरती थांबवली असून, पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांच्या निरिक्षणासाठी त्यांनी हा वेळ दिल्याचं कळत आहे.
Delhi | An AIIMS security guard has developed an allergic reaction after receiving COVID19 vaccination here today. He is kept under observation of doctors at the hospital: AIIMS official
— ANI (@ANI) January 16, 2021
IND Vs AUS 4th Test Live Score Updates
ओडिशामागोमाग इथं महाराष्ट्रातूनही लसीकरण मोहिम रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सरकारने व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी तयार केलेल्या कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे हे लसीकरण रद्द करण्यात आल्याची माहिती प्राथमिक स्वरुपात समोर आली होती.
लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं मनोहर अग्नानी आणि जे.एस. भंडारी यांनी भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी लसीकरण मोहिमेचा पहिला दिवस यशस्वी ठरल्याची माहिती दिली.
COVAXIN : कोवॅक्सिनच्या लसीकरणानंतर साईड इफेक्ट झाला तर भारत बायोटेक देणार भरपाई
देशात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्या धर्तीवर सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देशातील सर्व राज्यांत पोहोचली आहे. तर, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा पुरवठा 12 राज्यांतच करण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदमान निकोबार द्वीप समुहावर 78, आंध्र प्रदेशात 16963, अरुणाचल प्रदेशमध्ये 743, आसाममध्ये 2,721, बिहारमध्ये 16,401, चंदीगढमध्ये 195, छत्तीसगढमध्ये 4,985, दिल्लीत 3,403, गोव्यात 373 आणि गुजरातमध्ये 8,557 जणांना लस देण्यात आली.