Covid-19 Vaccine for Children : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया
एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये दोन ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर कोवाक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे. डीसीजीआयने 12 मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती.
![Covid-19 Vaccine for Children : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया aiims director randeep guleria said that covid 19 vaccine for children can be expected by september Covid-19 Vaccine for Children : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/2ec2e5a405afb56723f28d78c9090af6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असतानाआता तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोवाक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फिझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.
एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये दोन ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर कोवाक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे. डीसीजीआयने 12 मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक असल्याचं ठोस कारण नाही
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी हे नाकारले की, तिसऱ्या लाटात मुले बाधित होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी म्हटलं की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे या सिद्धांतावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. अलीकडेच WHO आणि एम्स यांनी एकत्रितपणे सेरो सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, प्रौढांपेक्षा मुलांचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही. दहा हजार प्रस्तावित लोकसंख्या असलेल्या पाच निवडक राज्यांमध्ये हा स्टडी करण्यात आला आहे. डॉ. गुलेरिया यांनी मुलांच्या शाळा सुरू करण्यावर विचार करण्यास देखील सांगितले आहे. मात्र शैक्षणिक संस्था कोरोनाचे सुपर स्प्रेडर होणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- Calf Serum in Covaxin: कोवॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण
- Coronavaccine : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती; वैज्ञानिकांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)