एक्स्प्लोर

Coronavaccine : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती; वैज्ञानिकांचा दावा

Coronavaccine : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती असा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याचा हा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत होती. अशातच केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय नेमका कोणत्या तथ्यांच्या आधारावर घेण्यात आला, असे प्रश्नही उपस्थित केले जात होते.

Coronavaccine : काही दिवसांपूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र सरकारकडून दुप्पट करण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलेलीच नव्हती, असा धक्कादायक दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. दरम्यान, 13 मे रोजी केंद्र सरकारनं कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांवरुन दुप्पट करुन ते 12 ते 16 आठवडे निश्चित केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन म्हणजेच, 'एनटीएजीआय'मधील वैज्ञानिकांच्या शिफारशीनुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. पण दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी आपला पाठिंबा नव्हता असा धक्कादायक खुलासा केंद्र सरकारच्या तज्ज्ञांच्या गटातील तीन सदस्यांनी केला आहे. 

वैज्ञानिकांच्या दाव्यासंदर्भात केंद्राचं स्पष्टीकरण

एनटीएजीआयचे चेअरमन डॉक्टर एन. के. अरोरा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यावेळी कुणीही या निर्णयाला विरोध केला नव्हता आणि वैज्ञानिक आधारावर, नागरिकांचे आरोग्य, समाजाचे हित लक्षात घेऊन त्यानंतरच हा निर्णय घेतला गेला होता. 


Coronavaccine : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती; वैज्ञानिकांचा दावा

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याचा हा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत होती. अशातच केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय नेमका कोणत्या तथ्यांच्या आधारावर घेण्यात आला, असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्यावेळी आरोग्य मंत्रालयानं स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन म्हणजेच, 'एनटीएजीआय' यांच्या सल्ल्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय घेण्यामागे काही वैज्ञानिक आधार आहेत, असं देखील आरोग्यमंत्रालयानं स्पष्टीकरणात सांगितलं होतं. 

पाहा व्हिडीओ : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती : तज्ज्ञ

आरोग्यमंत्रालयानं स्पष्टीकरणात ज्या वैज्ञानिकांच्या संस्थेचं नाव घेतलं होतं. त्याच संस्थेमधील तीन वैज्ञानिकांनी केंद्र सरकारला आपण कोणतीच शिफारस केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचंही या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे. या संस्थेमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. त्यापैकी तीन सदस्यानी हा दावा केला आहे. तसेच या निर्णयासाठी कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचं आम्हाला माहिती नाही, असंही ते म्हणाले आहेत. यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय का आणि कशाच्या आधारे घेतला, याबाबत वैज्ञानिकांमध्येही संभ्रम असल्याचं दिसून आलं आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यापासूनच याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच केंद्र सरकारनं लसीच्या डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय केवळ कोविशील्डच्या बाबतीतच घेतला होता. कोवॅक्सिनबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे लसीचा तुटवडा भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

केंद्राला कोवॅक्सिन लसीचा 150 रुपये प्रति डोस किमतीने पुरवठा दीर्घकाळ शक्य नाही : भारत बायोटेक

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget